केवळ महिलाच नव्हे तर पुरुषही गॉसिप करतात

जेव्हा अनेक महिला एकत्र येतात तेव्हा त्या कधीच शांत बसू शकत नाही. संधी मिळताच एकमेकांची उणीदुणी काढायला लागातात असं म्हटलं जात. मात्र नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आलाय की गॉसिपिंगमध्ये पुरुष महिलांपेक्षा काही कमी नाहीत.

Updated: Oct 16, 2017, 09:42 PM IST
केवळ महिलाच नव्हे तर पुरुषही गॉसिप करतात title=

मुंबई : जेव्हा अनेक महिला एकत्र येतात तेव्हा त्या कधीच शांत बसू शकत नाही. संधी मिळताच एकमेकांची उणीदुणी काढायला लागातात असं म्हटलं जात. मात्र नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आलाय की गॉसिपिंगमध्ये पुरुष महिलांपेक्षा काही कमी नाहीत.

महिलांप्रमाणेच पुरुषांनाही गॉसिपिंग करताना मजा येते आणि गॉसिपिंग करण्याची ते एकही संधी सोडत नसल्याचे रिपोर्टमधून समोर आलेय.

अमेरिकेतील ओटावा युनिर्व्हसिटीमध्ये करण्यात आलेल्या संशोधनातून ही बाब समोर आलीये. 

काय म्हणतो रिसर्च

या संशोधनानुसार महिला पुरुषांच्या तुलनेत अधिक गॉसिपिंग करतात. महिलांच्या गॉसिपिंगचे विषय हे इतर महिलांचे कपडे, राहणी आणि लुक्स हे असतात. तर दुसरीकडे पुरुषांच्या गॉसिपिंगचे विषय हे पैसा, लग्झरी लाईफ असतात.