मृत महिलेच्या गर्भाशयाच्या प्रत्यारोपणातून बाळाचा जन्म

वैद्यकीय इतिहासातील पहिली घटना 

मृत महिलेच्या गर्भाशयाच्या प्रत्यारोपणातून बाळाचा जन्म  title=

मुंबई :मृत महिलेने दान केलेल्या गर्भाशयाच्या प्रत्यारोपणातून ब्राझीलच्या एका महिलेने सुदृढ बालकाला जन्म दिला आहे. जगातील ही पहिलीच घटना आहे. 'लांसेट' या पत्रिकेत प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, मृत महिलेने दान केलेल्या गर्भाशयाच्या प्रत्यारोपणातून कधीही आई बनू न शकणाऱ्या महिलेने मुलीला जन्म दिला आहे. 

या वैद्यकीय इतिहासातील यशामुळे आता कधीही आई न बनू शकणाऱ्या हजारो महिलांना या प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेमुळे आशेचं किरण दिसू लागलं आहे. या अहवालाची सगळीकडे खूप चर्चा होत आहे.

ब्राझीलचे साओ पाउलो विश्वविद्यालयातील डानी एजेनबर्ग यांच्या या संशोधनाचे नेतृत्व केलं. एका 32 वर्षीय महिलेवर या गर्भाशय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया झाली. एका दुर्मिळ आजारामुळे या महिलेले जन्मतः गर्भाशय नव्हते. 

तर 45 वर्षीय एका महिले स्ट्रोकमुळे निधन झाले आणि तिचे गर्भाशय दान करण्यात आले. गर्भाशय प्रत्यारोपण झाल्यावर त्या महिलेचं शरीर नवीन अवयव स्वीकारत आहे की नाही हे पाहण्यासाठी पाच महिन्यांचा कालावधी गेला. त्यानंतर या गर्भाशयातून एका मुलीचा जन्म झाला.