वाढत्या उन्हावर मात करण्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा!

वाढत्या उन्हाला सामोरे जाण्यासाठी पोषक आहाराचे प्रमाण वाढवणे आणि भरपूर पाणी पिणे अतिशय महत्त्वाचे आहे.

Updated: Mar 7, 2018, 11:56 AM IST
वाढत्या उन्हावर मात करण्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा!

मुंबई : वाढत्या उन्हाला सामोरे जाण्यासाठी पोषक आहाराचे प्रमाण वाढवणे आणि भरपूर पाणी पिणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे उन्हाळा सुसह्य होण्यास मदत होईल. असे काही पदार्थ ज्यांचा आहारातील समावेश वाढत्या उन्हावर मात करण्यास फायदेशीर ठरतील. 

कैरी:

यात अनेक पोषकघटक असतात. वाढत्या उन्हात डिहायड्रेशनमुळे शरीरातील अनेक पोषकघटक कमी होतात. त्याची कमतरता भरून काढण्यासाठी कैरी उपयुक्त ठरते. उन्हामुळे घशाला कोरड पडते त्यावर कैरीचे पन्हे पिणे उत्तम ठरते. किंवा बारीक चिरलेला कांद्यात कैरीचे तुकडे आणि भाजलेलं जिरं घालून खा.

दही:

दह्यात हेल्दी बॅक्टरीया असल्याने अन्नपचनास मदत होते आणि इम्म्युनिटी सुधारते. त्यामुळे यंद्याच्या उन्हाळ्यात दही, लस्सी, ताक स्मूदी, रायता यांसारख्या पदार्थांचा अवश्य आस्वाद घ्या.

टरबूज:

जर तुम्हाला फळं खायला आवडत असतील तर टरबूज जरूर खा. कारण त्यात कमी प्रमाणात कॅलरीज आणि अधिक प्रमाणत अँटिऑक्सिडेन्ट असतात. तसंच कडक उन्हावर मात करण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी याची मदत होते.

काकडी:

ऊन आणि डिहाड्रेशनवर मात करण्यासाठी काकडी खाणे गरजेचे आहे. काकडीत ८८% पाणी असते. तसंच काकडीला थोडं मीठ लावून खाल्याने उन्हामुळे शरीरात निर्माण झालेली पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स ची कमतरता भरून निघते.

 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close