मनमोकळेपणाने हसण्याचे '७' फायदे!

लाफ्टर क्लबचे वाढते प्रस्थ तुमच्या नक्कीच लक्षात आले असेल.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Feb 13, 2018, 05:01 PM IST
मनमोकळेपणाने हसण्याचे '७' फायदे!

नवी दिल्ली : लाफ्टर क्लबचे वाढते प्रस्थ तुमच्या नक्कीच लक्षात आले असेल. याचे कारण म्हणजे हसण्यापासून मिळणारे फायदे. आरोग्यासाठी हसणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हसल्याने आरोग्यही चांगले राहते. पण त्याचबरोबर सौंदर्यातही भर पडते. 
'लॉफ्टर इज द बेस्ट मेडिसिन', हे तर तुम्ही ऐकले असेल. तर मग जाणून घेऊया. मनमोकळेपणाने हसण्याचे फायदे...

  1. मोठ्याने हसल्याने रक्ताभिसरण चांगले होते. 
  2. इम्युनिटी सिस्टम मजबूत होते. त्यामुळे आजारी पडण्याची शक्यता कमी होते. त्याचबरोबर शरीरात अँटी व्हायरल पेशीं जलद गतीने तयार होऊ लागतात.
  3. बॉडी पेन असणाऱ्यांना त्यापासून सुटका मिळते. असह्य दुखण्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टर लाफिंग थेरपीचा वापर करतात. मेडिकल प्रयोगातून असे सिद्ध झाले आहे की, १० मिनिटे मनमोकळेपणाने हसल्याने २ तास शांत झोप लागते.
  4. आजकालच्या जीवनशैलीमुळे नकारात्मक विचार, भावना लगेच येतात. त्यामुळे डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता अधिक वाढते. मात्र हसल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होऊ लागतो. हसल्याने आपल्या शरीरात इंडोर्फिन हार्मोन स्त्रवते आणि आपल्याला सकारात्मक वाटू लागते.
  5. हसण्याचा परिणाम आपल्या वयावरही दिसून येतो. हसणे ही एक प्रकारची स्ट्रेचिंग एक्ससाईज आहे. हसल्याने चेहऱ्याच्या स्नायूंना व्यायाम मिळतो आणि अंटी एजिंगला मदत होते.
  6. हसल्याने कॅलरीज बर्न होतात. त्यामुळे स्थुलता कमी होण्यास मदत होते. एक संशोधनानुसार, १५ मिनिटे हसल्याने १०-४० कॅलरीज बर्न होतात.
  7. हसल्याने आपली श्वसनक्षमता सुधारते. श्वास घेण्याचा आणि सोडण्याचा कालावधी वाढतो. त्यामुळे शरीराला अधिक प्रमाणात ऑक्सिजन मिळते. परिणामी शरीराची एनर्जी लेव्हल चांगली राहते. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close