झोपण्यापूर्वी नाभीत तूपाचे दोन थेंब टाकल्यास मिळतील '7' आश्चर्यजनक फायदे

आजकाल धकाधकीच्या युगात अनेकजण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.

Updated: Feb 9, 2018, 04:47 PM IST
झोपण्यापूर्वी नाभीत तूपाचे दोन थेंब टाकल्यास मिळतील '7' आश्चर्यजनक फायदे

मुंबई : आजकाल धकाधकीच्या युगात अनेकजण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.

प्रामुख्याने महिला आधी कुटुंबाकडे आणि नंतर स्वतःकडे लक्ष देतात. यामुळे नकळत त्यांच्या आरोग्यावर आणि त्वचेवर परिणाम होतात. या समस्यांपासून सुटका मिळवायची असेल तर रात्री झोपण्यापूर्वी केवळ काही थेंब तूप नाभीत टाकावे.  

कसा होतो फायदा ? 

बेंबी / नाभी हा शरीराचा असा एक भाग आहे जो शरीरातील सार्‍या नसांना जोडणारा अवयव आहे. त्यामुळे नाभीत तेल किंवा तूप घालून मसाज केल्याने शरीरात पोहचाणार्‍या सार्‍या नसांना आराम पोहचवण्यास मदत करते. आरोग्याच्या समस्या कमी होण्यासोबतच त्वचेचा पोत सुधारण्यासही मदत होते.  

कसा कराल हा घरगुती उपाय ? 

रात्री झोपण्यापूर्वी तूप थोडे कोमट स्वरूपात गरम करावे. त्यानंतर तूपाचे काही थेंब नाभीमध्ये घालावेत. नाभीजवळच्या भागाला सुमारे 5 मिनिटं मसाज करावा. 

काय होणार फायदे ? 

तुमचे केस फ्रिझी झाले असतील तर तूपाच्या या उपायाने केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते.  

शुष्क त्वचेला पुन्हा तजेला देण्यासाठी, शुष्क ओठांना पुन्हा मुलायम करण्यासाठी, चेहर्‍यावरील चमक पुन्हा आणण्यासाठी नाभीजवळील तूपाचा मसाज फायदेशीर ठरतो. 

रक्तप्रवाह सुधारण्यासाठी मदत झाल्याने केसांजवळील आणि त्वचेजवळील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते. 

तुमचे केस अकाली पांढरे झाले असल्यास या मसाजामुळे त्यांना अधिक बळकटी मिळते सोबतच केस घनदाट होण्यास मदत होते.   

वजन घटवण्यासाठीदेखील साजूक तूप फायदेशीर ठरते. सकाळी किमान 5-10 मिली लीटर तूप खाऊन दिवसाची सुरूवात केल्यास पचनक्रियेला चालना मिळते. सोबतच वजन घटवण्यास मदत होते. 

सांधेदुखीसारख्या आजारांना आटोक्यात आणण्यासाठी साजूक तूप फायदेशीर ठरते. तूपामध्ये ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड असल्याने हाडांच्या आरोग्याला मजबूती मिळेल. स्त्रियांमधील ऑस्टोपोरायसिसचा त्रास आटोक्यात आणण्यासाठी साजूक तूप फायदेशीर आहे.