सुंदर दिसण्यासाठी एवढंच करा

 प्रत्येकाला सुंदर दिसणे केव्हाही आवडते. त्यामुळे अनेक जण कोणतीना कोणती क्रीम किंवा कॉस्मेटीकचा वापर करत असतो. मात्र, घरच्या घरी तुम्ही काळजी घेतली तर तुम्हीही सुंदर दिसाल.

Updated: Jun 3, 2017, 09:33 AM IST
सुंदर दिसण्यासाठी एवढंच करा title=

मुंबई :  प्रत्येकाला सुंदर दिसणे केव्हाही आवडते. त्यामुळे अनेक जण कोणतीना कोणती क्रीम किंवा कॉस्मेटीकचा वापर करत असतो. मात्र, घरच्या घरी तुम्ही काळजी घेतली तर तुम्हीही सुंदर दिसाल.

चेहरा टवटवीत आणि चांगला दिसण्यासाठी बरेच जण विविध फेसवॉश किंवा साबण वापरतात. मात्र, त्याचा प्रभाव पडत नाही. काहीवेळी साईड इफेक्ट होतो. परंतु, घरगुती पदार्थांचा सौंदर्यवाढीसाठी वापर केला तर चेहरा चांगला राहतो आणि अ‍ॅलर्जी तसेच साईड इफेक्टपासून सुटका होते.

तुम्ही काय कराल?

- एक चमचा कोरफडीचा गर चेहऱ्याला लावा. अर्धा तासाने चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा. चेहरा चांगला होतो.

- मध, लिंबू आणि मलाईची पेस्ट तयार करा. या पेस्टने चेहऱ्याला मसाज करा. दहा मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. चेहरा न चोळता कपड्याने टिपून घ्या.

-  हळद आणि चंदन पावडरमध्ये दूध मिसळून तयार केलेल्या पेस्टने चेहऱ्याला लावा. दोन ते तीन मिनिटे चेहऱ्यावर हलका मसाज करा. दहा मिनिटांनी चेहरा धुवा. त्यानंतर चेहऱ्याचा तजेलदारपणा दिसून येईल. 

- रात्री तीन ते चार बदाम दुधात भिजवून ठेवा. सकाळी त्याची पेस्ट बनवून चेहऱ्याला लावा. अर्धा तासाने चेहरा धुवा.

- छोट्या टोमॅटोची पेस्ट बनवा. त्यामध्ये एका लिंबाचा रस आणि अर्धा चमचा बेसन घाला. याचे मिश्रण वीस मिनिटे चेहरा आणि मानेला लावा त्याचा फरक दिसून येईल.

- पिकलेले केळे दुधात मिसळून घ्या.. हे मिश्रण चेहऱ्याला लावा आणि वीस मिनिटांनी चेहरा स्वच्छ करा.

- तीन चमच लिंबाच्या रसात एक चमचा हळद पावडर मिसळून पेस्ट करा. चेहऱ्याला लावल्यानंतर अर्धा तासाने चेहरा धुवा.

- एक चमचा हळदीमध्ये दही मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहरा आणि मानेला लावा. पंधरा मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.