ब्रश करताना हिरड्यातून येणारे रक्त टाळण्यासाठी घरगुती उपाय

अनेकदा ब्रश करताना हिरड्यांमधून रक्त येते.

Updated: Jul 12, 2018, 01:00 PM IST
ब्रश करताना हिरड्यातून येणारे रक्त टाळण्यासाठी घरगुती उपाय

मुंबई : अनेकदा ब्रश करताना हिरड्यांमधून रक्त येते. हा त्रास सामान्य आहे असे समजून अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र ही समस्या वेळीच न ओळखल्यास यामधून अनेक आजारांचा धोका बळावू शकतो. म्हणूनच तुम्हांलाही हिरड्यांमधून रक्त येत असल्याचे आढळले तर या घरगुती उपायांकडे दुर्लक्ष करू नका. गरोदरपणात दातांचीही काळजी घ्या, अन्यथा गर्भपाताचा धोका !

हिरड्यांमधून रक्त येण्याच्या समस्येवर घरगुती उपाय 

लवंगाचं तेल -  

एखादी कडक वस्तू चावताना किंवा ब्रश करताना हिरड्यांमधून रक्त आल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. अशावेळेस लवंगाचं तेल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. 
लवंगाच्या तेलामध्ये कापसाचा बोळा बुडवा. हा बोळा हिरड्या आणि दातांवर काही वेळ ठेवा. थोड्या वेळाने कोमट पाण्याने तोंड स्वच्छ करा. लवंगाचं तेल नसल्यास दिवसातून 2 वेळेस तुम्ही लवंग चघळल्यासही आराम मिळू शकतो. 

व्हिटॅमिन सी - 

आहारात मुबलक व्हिटॅमिन सी घटकांचा समावेश करा. यामुळे इंफेक्शन वाढण्याचा धोका कमी होतो. दातांना आणि हिरड्यांना अधिक मजबुत करण्यासाठी व्हिटॅमिन सी युक्त कच्च्या भाज्या, फळांचा आहारात समावेश करा. 

राईचं तेल - 

रात्री झोपण्यापूर्वी चमचाभर तेलामध्ये चिमुटभर मीठ मिसळा. या मिश्रणाने दातांना आणि हिरड्यांना मसाज करा. नियमित या उपायामुळे हिरड्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. सोबतच हिरड्यांमधून रक्त पडण्याचा त्रास कमी होतो. ब्रश करताना ही चूक केल्यास...

तुरटी - 

दातदुखीचा त्रास कमी करण्यासाठी, ब्रश करताना रक्त पडण्याची समस्या आटोक्यात ठेवण्यासाठी तुरटीच्या पाण्याने गुळण्या कराव्यात. तुरटीचे अ‍ॅन्टी बॅक्टेरियल गुणधर्म हिरड्यातून रक्त पडण्याचा त्रास कमी करण्यास मदत करतात. सोबतच इंफेक्शनचा धोकाही कमी होतो. 

मीठ - 

दिवसातून किमान वेळेस मीठाच्या पाण्याने गुळण्या केल्यास तोंडाचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते. सोबतच इंफेक्शन कमी होण्यासही मदत होते. मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने होतील 8 फायदे 

टीप - हे केवळ घरगुती उपाय आहेत. व्यक्तीपरत्वे उपचार वेगवेगळे परिणाम देऊ शकतात. त्यामुळे योग्य तज्ञांच्या सल्ल्याने उपचार निवडणं फायदेशीर ठरते. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close