ब्रेकअपनंतही मुली 'एक्स'बॉयफ्रेंडवर लक्ष ठेवण्यासाठी करतात 'या' गोष्टी

आजकाल लग्नापेक्षा तरूणांची ब्रेकअप्स अधिक वेगाने होतात. 

Updated: Jun 3, 2018, 03:39 PM IST
ब्रेकअपनंतही मुली 'एक्स'बॉयफ्रेंडवर लक्ष ठेवण्यासाठी करतात 'या' गोष्टी  title=

मुंबई : आजकाल लग्नापेक्षा तरूणांची ब्रेकअप्स अधिक वेगाने होतात. कोणतेही रिलेशन संपले तरीही त्यामधून बाहेर पडणं कठीण असते. अशावेळेस मुली ब्रेकअप्समधून पटकन बाहेर पडत नाही. त्यांना वास्तवात नात्यातून बाहेर पडल्या तरीही मानसिकदृष्ट्या लगेच बाहेर पडत नाही. मग पहा त्यांच्या EX वर कशा लक्ष ठेवून ठेवतात हे नक्की जाणून घ्या. 

पहा काय काय करतात मुली ? 

सोशल मीडीयाच्या मदतीने त्या एक्सच्या अपडेटवर लक्ष ठेवून असतात. त्यांनी काय काय केले यावर लक्ष ठेवून असतात.  

मुलींच्या मनातील राग सोशल मीडियामध्ये व्यक्त करताना त्या अनेकदा त्यांच्या पार्टनरला ब्लॉक करता, अनफ्रेंड करतात. प्रसंगी अनब्लॉक किंवा अनफ्रेंड करून त्यांच्या अपडेट्स तपासतात.  

शॉपिंग हा मुलींसाठी पुन्हा मूड सुधारण्याचा मार्ग आहे. त्यामुळेच ब्रेकअपनंतर मूड ऑफ असेल तर त्या अनेकदा शॉपिंगचा मार्ग निवडतात. 

वेळोवेळी त्या राग व्यक्त करण्याची कोणतीच संधी सोडत नाही. फोनवर किंवा मेसेजमधून त्या कानउघडणी करतात. 

'एक्स'ला विसरण्यासाठी अनेकदा मुली नव्या व्यक्तीमध्ये आपलं मन, वेळ गुंतवतात. एक्ससमोर इतर व्यक्तींशी अधिक जवळ असल्याचे दाखवून देतात.  

जुन्या कडू आठवणीतून बाहेर पडण्यासाठी मुली अनेकदा छंद किंवा त्यांच्या आवडीच्या गोष्टींमध्ये आपलं मन गुंतवतात.