वजन कमी करण्याचा रामबाण उपाय - हिरडा

वजन कमी करण्यासाठी लोक काय काय नाही करत. अनेक तास जिम करणे, डाएटिंग आणि इतर अनेक उपाय केले जातात. मात्र त्यानंतरही अनेकांचे वजन काही कमी होत नाही. तुम्हीही असेच प्रयत्न करत आहात आणि त्यानंतरही वजन कमी होत नाहीये तर टेन्शन घेऊ नका. कारण हिरड्याच्या वापराने तुम्ही सोप्या पद्धतीने वजन कमी करु शकता. 

Updated: Oct 20, 2017, 02:39 PM IST
वजन कमी करण्याचा रामबाण उपाय - हिरडा title=

मुंबई : वजन कमी करण्यासाठी लोक काय काय नाही करत. अनेक तास जिम करणे, डाएटिंग आणि इतर अनेक उपाय केले जातात. मात्र त्यानंतरही अनेकांचे वजन काही कमी होत नाही. तुम्हीही असेच प्रयत्न करत आहात आणि त्यानंतरही वजन कमी होत नाहीये तर टेन्शन घेऊ नका. कारण हिरड्याच्या वापराने तुम्ही सोप्या पद्धतीने वजन कमी करु शकता. 

हिरडा ही औषधी वनस्पती आहे. त्रिफला चूर्णामध्ये हिरड्याचा वापर केला जातो. याचे अनेक औषधी गुणही आहेत. 

ज्यांना सतत पोटाचे विकार होत असतात त्यांच्यासाठी हिरडा हे  वरदान आहे. पाचनशक्ती सुधारण्यासाठी, गॅसचा त्रास, पोट साफ ठेवण्यासाठी हिरड्याचा वापर होतो. मात्र याचबरोबर तुम्ही वजन कमी करण्यासाठी हिरड्याचा वापर करु शकता. 

असा करा वापर

३-६ ग्रॅम हिरडा पावडर पाण्यात टाकून उकळवा. ही पावडर तुम्हाला कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात मिळू शकते. 

पाणी उकळल्यानंतर ते पाणी गाळून घ्या.

गाळलेल्या पाण्यात मध मिसळा. 

हे मिश्रण दररोज रिकाम्या पोटी घ्या.