खरं प्रेम की आकर्षण... कसा ओळखाल यामधील फरक?

प्रेम, आकर्षण आणि वेड अशा तीन वेगवेगळ्या टप्प्यात प्रेमाची  भावना असते. 

Updated: May 9, 2018, 08:37 PM IST
खरं प्रेम की आकर्षण... कसा ओळखाल यामधील फरक?   title=

मुंबई : प्रेम, आकर्षण आणि वेड अशा तीन वेगवेगळ्या टप्प्यात प्रेमाची  भावना असते. आजकाल तरूणांना सार्‍याचीच घाई असते. त्यामुळे जितक्या झटपट प्रेम होतं त्याहून लवकर ब्रेकअप्स होतात. अशी टीका केली जातं. पण आज खरंच नात्याला लेबल लावण्यापूर्वी दोघांचं एकत्र येणं हे प्रेम असतं की आकर्षण याचा विचार केला जात नाही. मग पहा यामध्ये नेमका फरक कोणता असतो?  नक्की वाचा :   पहिल्या डेटवर हे '8' प्रश्न विचारायला विसरू नका !

कसा ओळखाल प्रेम, आकर्षण आणि केवळ वेडामधील फरक ?

#1 आकर्षण वाटत असताना तुम्ही सारखा त्या व्यक्तीचा विचार करता, तुम्हाला सारखं त्या व्यक्तीसोबत असावं वाटतं, लाडात, प्रेमात यावं वाटतं किंवा नुसतं त्याला/तिला  बघूनही बरं वाटतं. पण प्रेमात तुम्ही त्या व्यक्तीसोबत असणं मिस करता तसंच त्या व्यक्तीसोबत बोलावं वाटतं. असं वाटत जरी असलं तरी भेटण्यास जमणार नसेल तर फोन, मेसेजवर बोलून देखील तुम्ही आनंदी होता.
 
#2 आकर्षण हे काहीसं बालिश असल्याने तुम्ही सारखे त्या व्यक्तीच्या मागे असता. म्हणजेच त्याचे/तिचे प्रत्येक फोटोज, स्टेटस लाईक करणे, कमेंट करणे तसेच कॉम्प्लिमेंट देणे. व्हॉट्सअ‍ॅपवर लास्ट सीन सतत चेक करणे. 

#3  तुम्हाला भेटून कमी दिवस झाले असले तरी तुमचे स्वप्नरंजन चालू होते. तुम्ही त्या व्यक्तीचा लाईफ पार्टनर म्हणून विचार करू लागता. प्रेमात असं लगेच काही होत नाही. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. तुम्हाला एखादी व्यक्ती प्रथम भेटीत किंवा बघताक्षणी आवडू शकते. पण प्रेमभावना निर्माण व्हायला थोडा वेळ द्यावा लागतो. तो पर्यंत सगळं आकर्षण असतं.

#4 काही दिवसांच्या भेटीतच तुम्ही त्या व्यक्तीला पूर्ण ओळखता असा तुमचा दावा असतो. तुम्ही त्यांच्यासाठी निर्णय घेऊ लागता किंवा त्यांचे उत्तर काय असेल हे गृहीत धरू लागता. पण असे करू नका कारण काही महिन्यांतच ती व्यक्ती तुमच्या इच्छा-अपेक्षांपेक्षा वेगळं  वागू लागेल आणि तुमच्या आशेचा हा फुगा लगेच फुटेल. 

#5  ती व्यक्तीसोबत नसताना एकटेपणा जाणवतो. तर खऱ्या प्रेमात ती व्यक्तीसोबत नसतानाही तुम्ही आनंदी आणि उत्साही असता. आकर्षणामध्ये त्या व्यक्तीच्या सतत जवळ राहावेसे वाटते.

#6 तुमचं आयुष्य त्या व्यक्तीभोवती फिरत राहतं. त्याचा परिणाम काम आणि वैयक्तिक आयुष्यावर होतो. तुमचा बराचसा वेळ त्या व्यक्तीच्या विचारात व्यतीत होतो. त्या व्यक्तीसाठी तुम्ही काहीही करायला तयार होता. खऱ्या प्रेमात असं काही होत नाही. प्रेमात एकमेकांना साथ देताना आनंद मिळतो. तुम्ही एकमेकांना स्वीकारता आणि नाते अधिक घट्ट करण्याचा प्रयन्त करता. आकर्षणात तुम्ही त्याग करायला तत्पर असता आणि जेव्हा त्याची तीव्रता कमी होते तेव्हा हाच त्याग कंटाळवाणा वाटू लागतो.