नात्यातील रोमान्स गायब होत आहे? मग या ४ गोष्टी करा!

 बऱ्याचदा लग्नाच्या काही वर्षांनंतर कपल्समधील रोमान्स फिका होऊ लागतो.

Updated: Jun 6, 2018, 07:17 AM IST
नात्यातील रोमान्स गायब होत आहे? मग या ४ गोष्टी करा! title=

मुंबई : बऱ्याचदा लग्नाच्या काही वर्षांनंतर कपल्समधील रोमान्स फिका होऊ लागतो. सुरुवातील सर्व काही गोड-गोड असलेल्या नात्यात कालांतराने काहीतरी हरवल्यासारखे वाटू लागते. पण नेमके काय मिसिंग आहे ते कळत नाही. त्यामुळे अनेकदा वादाला तोंड फुटते तर कधी कळत-नकळत नात्यात दुरावा येऊ लागतो. नात्यातील चार्म हरवतो. तुमच्या बाबतीतही असे झाले आहे का? मग या टिप्स तुमच्या फायद्याच्या आहेत. नात्यातील हरवलेला चार्म, उत्सुकता, आनंद, नवेपणा परत आणण्यासाठी या टिप्स नक्कीच कामी येतील...

# तुमची पहिली भेट तुम्हाला आठवते का? पहिला स्पर्श, हातात घेतलेला हात, हे सगळे आठवतंय का? हो. तर मग हे पुन्हा एकदा जगा. म्हणजे या गोड आठवणी ताज्या करण्यासाठी पुन्हा एकदा त्याच ठिकाणी आपल्या पार्टनरसोबत जा. पार्टनरसाठी नक्कीच हे सुखद सरप्राईज असेल. नात्यातील प्रेम, गोडव्याची नव्याने जाणीव होईल.

# नात्यात पुन्हा एकदा प्रेम, रोमान्स जागृत व्हावा असे खरंच वाटत असल्यास एक दिवस तुमचा आणि पार्टनरचा फोन रुममधून बाहेर ठेवा. कारण दिवसभर ऑफिसमधील काम, मोबाईल, इतर कामांच्या व्यापात आपले नात्यांकडे फारसे लक्ष नसते. त्यामुळे मोबाईल तुमच्या नात्यातील अडसर ठरू देऊ नका. म्हणून एक दिवस हा प्रयोग करुन पहा.

# पार्टनरसोबत एखादा क्लास जॉईन करु शकता. म्हणजे जर तुम्हाला डान्सची आवड असेल तर डान्स क्लास किंवा मग स्विमिंग क्लास, जिम, योगा क्लास तुम्ही जॉईन करु शकता. हे शक्य नसल्यास इव्हनिंग किंवा मॉर्निंग वॉक एकत्र घ्या. त्यामुळे एकमेकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि नात्यात रोमान्स पुन्हा निर्माण होईल.

# काही ठराविक कालावधीनंतर पार्टनरला स्पेशल ट्रीट करा. त्यामुळे पार्टनरला स्पेशल असल्याचे फिल होईल. पार्टनर नेहमीच स्पेशल असतो पण त्याची जाणीव करुन दिल्याने नात्यात उत्साह टिकून राहतो.