.. म्हणून इअरफोन्स कधीच शेअर करू नका

इअरफोन शेअर करणं का आहे चूकीची सवय

health.india.com | Updated: Sep 12, 2017, 06:57 PM IST
.. म्हणून इअरफोन्स कधीच शेअर करू नका

 मुंबई : अनेकदा आपण हेडफोन्स आपल्यासोबत घ्यायला विसरतो. अशावेळेस घाईघाईत आपण मित्रमैत्रिणींकडून त्यांचे हेडफोन्स घेऊन वेळ मारून नेतो. तुमचे काम कदाचित होत असेल पण ही सवय आरोग्यावर नकळत विपरित परिणाम करून जाते. हेडफोन्स शेअर करणं ही सवयच मूळात कशी त्रासदायक आहे हे अनेकांना ठाऊक नसते.  

  इअरफोन शेअर करणं का आहे चूकीची सवय -
 कानात तयार होणारा चिकट स्वरूपाचा मळ हा नैसर्गिक आणि कानाचे आरोग्य जपण्यासाठी आवश्यक असतो. पण या चिकट स्त्रावामध्ये काही बॅक्टेरियादेखील छुप्या स्वरूपात वाढत असतात. 
 
 सतत इअरफोनचा वापर केल्याने बॅक्टेरियाचा धोकाही वाढतो. तुम्ही इतरांचे हेडफोन्स वापरल्यास या बॅक्टेरियांमुळे होणार्‍या इंफेक्शनचा धोकाही वाढतो. कारण इअरफोनच्या माध्यमातून त्याचा प्रसार होऊ शकतो. 
 
 इअर फोनवर स्पॉन्ज असेल तर ते नियमित महिन्याभराने बदलणं गरजेचे आहे.  यामुळे इंफेक्शनचा धोका कमी होतो. 
 
 कानाजवळच्या जखमांमुळे बॅक्टेरियांचा धोका वाढतो परिणामी काही त्वचारोगांचा धोका संभावतो. 
 
 इअरफोन्स सुरक्षित आणि स्वच्छ जागी ठेवावेत. यामुळे इअरफोन्सवर जंतू वाढण्याचा धोका कमी होतो. अनेकदा अस्वच्छ जागी इअरफोन्स ठेवल्याने फंगस, ब्लॅकहेड्स आणि स्पॉट्सचा त्रास वाढतो. त्यामुळे इअरफोन्स नियमित स्वच्छ ठेवा.