लग्न टाळण्यासाठी मुली कोणती कारणे पुढे करतात?

आपल्या आवडत्या मुलासोबतच लग्न करायला मिळावे ही प्रत्येक मुलीची मनोमन इच्छा असते.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Dec 25, 2017, 04:03 PM IST
लग्न टाळण्यासाठी मुली कोणती कारणे पुढे करतात? title=

मुंबई: लग्न हा प्रत्येकाच्य जीवनातला एक महत्त्वाचा टप्प आहे. तरीही प्रत्येकजण यासाठी लगेच राजी होईल असे मुळीच म्हणता येणार नाही. त्यातही मुलांपेक्षा मुली लग्नाचा मुद्दा टाळण्यावर अधिक भर देतात, असे अनेकांचे म्हणने असते. मुलांप्रमाणेच मुलींचीही आपल्या लग्नाबाबत स्वप्नं असतात. त्यात लग्नासाठी आपल्यावर कोणाचाही दबाव येऊ नये. तसेच, आपल्या आवडत्या मुलासोबतच लग्न करायला मिळावे ही प्रत्येक मुलीची मनोमन इच्छा असते. आजच्या काळात तर मुली लवकर लग्नच करत नाहीत. त्यासाठी त्या लग्नाचा मुद्दाच टाळू पाहतात. म्हणूनच जाणून घ्या लग्नाच्या मुद्दा टाळण्यासाठ मुली काय बहाने करतात.

माझे शिक्षण सुरू आहे.

लग्नाचा मुद्दा टाळण्यासाठी मुलींचे आवडते कारण म्हणजे, अद्याप माझे शिक्षण सुरू आहे. मला माझे करिअर करायचे आहे. त्यामुळे इतक्यातच लग्न करण्याचा माझा कोणताच विचार नाही. शिक्षण पूर्ण झाले की, मी लग्नबाबबत नक्की विचार करेन.

मम्मी, पप्पांना सोडून कोठेच जाणार नाही.

नाही. मी माझ्या मम्मी, पप्पांना सोडून कोठेच जाणार नाही. माझे त्यांच्यावर खूप प्रेम आहे. त्यामुळे त्यांना सोडून मी कोठेच जाणार नाही. जर लग्न करायचेच असेल तर, मी आणि माझा नवरा माझ्या मम्मी, पप्पांसोबतच राहीन.

छे..अजून माझे लग्नाचे वय झाले नाही.

अनेक मुलींना असे वाटते की, माझे अद्याप लग्नाचे वय झाले नाही. माझे लग्नाचे वय झाले की, मी लग्नाबाबत नक्की विचार करेन. अर्थात कोणत्याही वयात मुली स्वत:ला छोट्याच समजत असतात हे विशेष. हे विधान सर्वच मुलींना लागू होत नाही.

मला स्वयंपाक येत नाही.

अद्याप मला स्वयंपाक करता येत नाही. तर, दुसऱ्याच्या घरी जाऊन स्वयंपाक कसा करू? म्हणूनच मी आधी स्वयंपाक शिकेन आणि मगच लग्न करेन.