फिटनेस फ्रिक करिना कपूर जीममध्ये गाळतेेय घाम...

फिटनेस फ्रिक अभिनेत्री करिना कपूर खान आपल्या फिटनेससाठी किती मेहनत घेते, ते पहा.

Updated: May 17, 2018, 10:54 AM IST
फिटनेस फ्रिक करिना कपूर जीममध्ये गाळतेेय घाम...

मुंबई : बॉलिवूड सेलिब्रेटीज आपल्या फिटनेसबद्दल अत्यंत जागरुक असतात. अशीच फिटनेस फ्रिक अभिनेत्री करिना कपूर खान आपल्या फिटनेससाठी किती मेहनत घेते, ते पाहुया. दीड वर्षांचा मुलगा असूनही अगदी फिट आणि हेल्दी राहण्यासाठी करिना जीममध्ये खूप मेहनत घेते.

झिरो फिगर करिना कपूरचे जीममधील काही व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आले. उत्तम आरोग्यासाठी करिनाची अथक मेहनत यातून दिसते. नम्रता पुरोहीत यांनी शेअर केलेले व्हिडिओज पहा...

लवकरच करिना वीरे दी वेडींग सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. तैमुरच्या जन्मानंतर हा करिनाचा पहिलाच सिनेमा आहे. वीरे दी वेडींग सिनेमातू चार मैत्रिणींचे बॉण्डींग पाहायला मिळेल. हा सिनेमा १ जूनला प्रदर्शित होईल. 
करिनाचा मुलगा तैमुर लहान असल्याने त्याला अधिक वेळ देणे गरजेचे आहे. तरी देखील वर्षातून एक किंवा दोन सिनेमात काम करणार असल्याचे करिनाने चाहत्यांना प्रामिस केले. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close