तुम्हीही नाईट शिफ्ट करताय? सावधान...

ग्लोबलायझेशनच्या या युगात अनेक कंपन्या २४ X ७ काम करताना आढळतात. त्यामुळे अनेक कर्मचारी 'नाईट शिफ्ट'मध्ये काम करताना दिसतात. काहींना आता तर असल्या नाईट शिफ्टची सवय झालीय... तर काही जण त्याचा प्रयत्न करत आहेत.

Updated: Dec 14, 2017, 11:45 PM IST
तुम्हीही नाईट शिफ्ट करताय? सावधान... title=

मुंबई : ग्लोबलायझेशनच्या या युगात अनेक कंपन्या २४ X ७ काम करताना आढळतात. त्यामुळे अनेक कर्मचारी 'नाईट शिफ्ट'मध्ये काम करताना दिसतात. काहींना आता तर असल्या नाईट शिफ्टची सवय झालीय... तर काही जण त्याचा प्रयत्न करत आहेत.

पण, अशा नाईट शिफ्ट तुमच्या शरीरासाठी किती धोकादायक आहेत? याची जाणीव तुम्हालाही नसेल... जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, सतत नाईटशिफ्टमध्ये काम करणाऱ्यांमध्ये कॅन्सरचा धोका वाढतो.

'नाईट शिफ्ट'चे दुष्परिणाम...

- अनेक प्रकारच्या आजारांशी लढण्याची शरीराची ताकद हळू हळू क्षीण होऊ लागते. 

- नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या मुख्य तक्रारींमध्ये एक तक्रार प्रामुख्यानं आढळते... ते म्हणजे झोप पूर्ण न होणं... किंवा झोप न लागणं... अशी लोक नेहमीच थकलेले दिसतात. 

- याचा मानसिक परिणामही होऊ शकतो... नाईट शिफ्ट करणाऱ्या लोकांना एखादी गोष्ट समजण्यासाठी वेळ लागू शकतो... किंवा त्यांच्यातली भावना हळूहळू कमी होत जाते. 

- नाईट शिफ्ट करणाऱ्यांचा रक्तदाब अचानक वाढायला लागतो. 

- रक्तवाहिन्यांमध्ये दबाव वाढतो... त्यामुळे मधुमेह होण्याचा धोका वाढतो. 

- यामुळे आतड्याचा आणि ब्रेस्ट कॅन्सरचा धोकाही वाढतो. 

- नाईट शिफ्ट करणारे कार्बोहायड्रेट असणाऱ्या गोष्टी खात राहतात... त्यामुळे त्यांचं वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळेही डायबेटिजचा धोका वाढतो. 

नाईट शिफ्ट करणं हे गरजेचं आहे की अपरिहार्य गोष्ट... हा वादाचा मुद्दा ठरू शकतो. मात्र, याचे दुष्परिणाम रोखण्यासाठी कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना योग्य खाण्याची सुविधा उपलब्ध करून देऊ शकतात... कारण, जसा नाईट शिफ्टचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या शरीरावर होतो... तसाच तो कंपनीच्या उत्पन्नावरही होतो.