अशा प्रकारच्या पुरुषांना प्रेमात मिळतो धोका!

 प्रेम व विश्वासाच्या बळावरच नातं मजबूत होतं. 

Updated: Jul 20, 2018, 01:52 PM IST
अशा प्रकारच्या पुरुषांना प्रेमात मिळतो धोका! title=

मुंबई : प्रेम व विश्वासाच्या बळावरच नातं मजबूत होतं. वर्षानुवर्ष एकमेकांशी साथ दिल्यानंतरही काही महिला दुसऱ्या पुरुषाकडे आकर्षित होतात. याची अनेक कारणे असतील. पण कशा प्रकारच्या पुरुषांना पत्नीकडून धोका मिळू शकतो ठाऊक आहे? मग जाणून घेऊया...

तुम्ही घरच्या कामात पत्नीची मदत करता का? नाही. तर मग जरा सांभाळून राहा. कारण यामुळे पत्नी धोका देण्यास प्रवृत्त होते. असे एका फ्रेंच संशोधनातून समोर आले आहे. महिला लग्नानंतर परपुरूषाकडे आकर्षित होण्याची कारणं

 

संशोधनातून मजेशीर माहिती आली समोर 

अलिकडेच झालेल्या फ्रेंच संशोधनातून एक मजेशीर माहिती समोर आली आहे. पती जर पत्नीला घरकामात मदत करत नसेल तर पत्नी अशा पतीला धोका देऊ शकते. ग्लीडन नावाच्या एक्स्ट्रा मॅरेटीयल वेबसाईटने महिलांवर अभ्यास केला. या अभ्यासातून असे सिद्ध झाले की, जर पती टॉयलेट साफ करणे, वॉशिंग मशीनमधून कपडे काढणे यांसारख्या कामात पत्नीची मदत करत नसेल तर पत्नी धोका देऊ शकते. 'या' वयातील महिला अधिक रोमॅन्टिक !

 

महिलांना हे आवडत नाही

कामे न केल्याने महिलांचे पार्टनरसोबत भांडणं होतात. त्यामुळे त्या खूप त्रासतात. त्याचबरोबर घरातील कामांप्रती औदासीन्य दाखवणं, महिलांना आवडत नाही, असे अभ्यासातून समोर आले आहे.

असे जिंका पत्नीचे मन

त्यामुळे पतींनाही घराची साफसफाई आणि घरातील कामात मदत करुन पत्नीचे मन जिंकण्याचा सल्ला, या अभ्यासातून देण्यात आाला आहे. तुमच्या पार्टनरला अधिक रोमँटिक करतील या टिप्स