अवघ्या 45 सेकंदात मिळवा डोकेदुखीपासून आराम

 जे लोक सतत कॉम्प्यूटरवर काम करत असतात त्यांना प्रामुख्याने डोकेदुखीचा त्रास सतावतो. 

Updated: Aug 12, 2017, 08:41 PM IST
अवघ्या 45 सेकंदात मिळवा डोकेदुखीपासून आराम

मुंबई : ऑफिस, घर, प्रवास, बाजार अशा एक ना अनेक ठिकाणी आपणास डोकेदुखीने त्रस्त असलेली मंडळी पहायला मिळेल. डोकेदुखीचा त्रास सुरू झाला की, कशातच लक्ष लागत नाही. शरीर आणि मनावर मरगळ येते. झोपून किंवा पडून रहावे वाटते. केव्हा एकदा डोकेदुखीपासून मुक्ती मिळते असे वाटते. जे लोक सतत कॉम्प्यूटरवर काम करत असतात त्यांना प्रामुख्याने डोकेदुखीचा त्रास सतावतो. वरवर पाहात डोकेदुखी हा एक किरकोळ आजार म्हणून लोक डॉक्टरकडे जाणे टाळतात. तर, काही लोक मेडिकल स्टोअर्सचा रस्ता धरतात आणि एखादी पेनकिलर घेऊन टाकतात. काहीजण बाम चोळतात, असे करण्याने तुम्हाला आराम मिळतो. पण, कारणाशीवाय औषधाचा अतिरीक्त डोसही तुमच्या शरीरात जातो. म्हणूनच जाणून घ्या डोकेदुखीपासून आराम मिळविण्याची अत्यंत सोपी पद्धत…

आयुर्वेदात सांगितले आहे की, आपल्या शरीरात एक विशिष्ट प्रकारची उर्जा वाहात असते. या उर्जेचे शरीरातील वेगवेगळ्या 12 पॉइंट्समधून वहन होत असते. या 12 पॉईटमध्ये भुवईचाही समावेश आहे. भुवई म्हणजे तुमचे कपाळ आणि डोळ्यांच्य मधला केसाळ प्रदेश. तर हे पॉइंट शरीरातील कोणत्या ना कोणत्या बॉडी पार्टसोबत जोडलेले असतात. यावर एक्युप्रेशर पुर्णपणे काम करते. म्हणूनच डोकेदुखीवेळी तुम्ही जेव्हा आपल्या भुवया योग्य पद्धतीने दाबता तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या बॉडीपार्टवर पडतो. हा परिणाम एखाद्या व्यायामाप्रमाणे काम करतो.

तुम्ही जर भुवयीचे पॉईंट अत्यंत अचूक आणि योग्य पद्धतीने दाबले तर केवळ 45 मिनिटांमध्येच तुम्हाला डोकेदुखीपासून आराम मिळू शकतो.  भुवयांवर दाब पडल्याने आपले ब्लड सर्क्युलेशन चांगले होते. डोकेदुखीवेळी भुवयांवर दाब पडल्याने आपल्या डोक्यात एक खास पद्धतीचे केमिकल Endorphins रिलीज होते. ज्यामुळे आपल्याला डोकेदुखीपासून आराम मिळतो. महत्वाचे असे की, ही अत्यंत सोपी आणि कधीही, कोणत्याही ठिकाणी करता येण्यासारखी सोपी पद्धती आहे. तसेच, या प्रयोगामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारे थकवा येत नाही. उलट मुड फ्रेश होतो. अशा प्रकारे तुम्ही डोकेदुखीवर उपाय केलात आणि तुम्हाला फायदा झाला तर, तुम्हाला कोणत्याही प्रकारची गोळी, बाम किंवा इतर औषध उपाय करण्याची गरज नाही.

दरम्यान, वरील उपाय अत्यंत साधा आणि सोपा असला तरी, त्याचा अतिरेक करू नये. भुवयीवरील दाब योग्य प्रमाणात व नियंत्रीत असावा. चुकीच्या पद्धतीने व चुकीच्या ठिकाणी पडलेला दाब तुम्हाला अपायकारक ठरू शकतो. त्यासाठी एकदा तुम्ही तज्ज्ञाचा सल्ला घेतल्यास उत्तम.