उन्हाळ्यात घामोळ्याच्या त्रासाने हैराण...हे करा उपाय

अंगाची काहिली करणारा उन्हाळा सुरु झालाय. उन्हाळ्यात अनेकांना घामोळ्याचा त्रास जाणवतो. यामुळे जळजळ आणि खाजही येते. बाजारात घामोळ्यांसाठी अनेक पावडरी असतात. मात्र त्याने तात्पुरता आराम मिळतो. घामोळ्यांवर तुम्ही घरगुती उपायही करु शकता.

Updated: Apr 16, 2018, 03:19 PM IST
उन्हाळ्यात घामोळ्याच्या त्रासाने हैराण...हे करा उपाय

मुंबई : अंगाची काहिली करणारा उन्हाळा सुरु झालाय. उन्हाळ्यात अनेकांना घामोळ्याचा त्रास जाणवतो. यामुळे जळजळ आणि खाजही येते. बाजारात घामोळ्यांसाठी अनेक पावडरी असतात. मात्र त्याने तात्पुरता आराम मिळतो. घामोळ्यांवर तुम्ही घरगुती उपायही करु शकता.

हळद - हळजीत अँटीबायोटिक गुण असतात. मीठ, हळद आणि मेथी एक प्रमाणात घेऊन वाटून घ्या. आंघोळीआधी हे मिश्रण शरीराला लावा आणि पाच मिनिटांनी आंघोळ करा. आठवड्यातून एकदा या मिश्रणाने एकदा आंघोळ करा. 

बर्फाचा तुकडा - प्लास्टिक अथवा कपड्यात बर्फाचा तुकडा घेऊन घामोळ्यांवर लावा. ५ ते १० मिनिटे बर्फाच्या तुकडा घामोळ्यांवर फिरवा. ४ ते ६ तासांनी हा प्रयोग पुन्हा करा.

कोरफड - त्वचेशी संबंधित समस्यांवर कोरफड हा उत्तम पर्याय आहे. कोरफडीचा गर घामोळ्यांवर लावल्यास आराम मिळतो.

चंदन - चंदनामध्ये शीतल गुण असतात. यामुळे चंदनाची पावडर आणि धणे पावडर एका प्रमाणात घेऊन मिसळा. यात गुलाबजल टाकून मिश्रण बनवा. काही वेळाने थंड पाण्याने धुवा. यामुळे घामोळ्यांमुळे होणारी जळजळ थांबेल.

मुलतानी माती - उन्हाळ्यात होणाऱ्या घामोळ्यांवर उपचार म्हणून मुल्तानी मातीचा वापर फायदेशीर ठरतो. मुलतानी मातीमध्ये गुलाबजल मिसळून हा लेप लावल्यास घामोळ्यांपासून संरक्षण होते.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close