टी बॅग्स या टॉयलेट सीटपेक्षा १७ पट अस्वच्छ

दिवसाचा बराच वेळ हा ऑफिसमध्ये जातो. त्यामुळे फ्रेश राहण्यासाठी अनेकदा झटपट चहाची निवड केली जाते. पण संशोधकांनी नुकतीच टी बॅग्सबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. 

Updated: Dec 12, 2017, 08:54 PM IST
टी बॅग्स या टॉयलेट सीटपेक्षा १७ पट अस्वच्छ   title=

मुंबई : दिवसाचा बराच वेळ हा ऑफिसमध्ये जातो. त्यामुळे फ्रेश राहण्यासाठी अनेकदा झटपट चहाची निवड केली जाते. पण संशोधकांनी नुकतीच टी बॅग्सबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. 

काय म्हणतात संशोधक 

संशोधकाच्या दाव्यानुसार टी बॅग्सवर टॉयलेट सीटपेक्षा अधिक कीटाणू असतात.  त्यामुळे नकळत तुम्ही आरोग्याचं नुकसान करत आहात.  

टॉयलेट सीटपेक्षा १७ पट अधिक कीटाणू हे टी बॅग्सवर असतात.  टीबॅगवर ३७८५ कीटाणू असतात तर टॉयलेटसीटवर हे प्रमाण केवळ  २२० कीटाणू असतात. 

किचनमधील इतर वस्तू  किती  घातक ? 

टी बॅग्सप्रमाणे बॅक्टेरियांच्या घातकपणाचा विचार केल्यास केटल हॅन्डलवर २४८३, वापरलेल्या मगच्या तळाशी १७४६ आणि फ्रीजच्या डोअर हॅन्डलवर  १५९२ बॅक्टेरियांचा प्रादुर्भाव असू शकतो.  
त्यामुळे वॉशरूमधून बाहेर पडल्यावर आपण जसे हात स्वच्छ धुतो तसे ऑफिस किचन वापरल्यानंतरही हात स्वच्छ करण्याची गरज आहे.  

Initial Washroom Hygiene ने याबाबतचा अभ्यास केला आहे.  किचनमधील भांडी आणि इतर वस्तू आणि त्यावरील कीटाणूंचा वावर याबाबत यामध्ये अभ्यास करण्यात आला.