HIVपासून महिलांना मिळणार सुरक्षा; उपाय सापडल्याचा संशोधकांचा दावा

 कॅनडातील वाटरलू विद्यापिठातील संशोधकांचा दावा आहे की, त्यांनी या उपायापेक्षा अगदी हटके शोध लावला आहे. या शोधानुसार एचआयव्हीच्या संसर्गाला आळा घालता येऊ शकतो.

Updated: Apr 16, 2018, 07:19 PM IST
HIVपासून महिलांना मिळणार सुरक्षा; उपाय सापडल्याचा संशोधकांचा दावा

नवी दिल्ली: संशोधकांनी एक असे संशोधन (एप्लांट) विकसित केले आहे जे, महिलांना योनिमार्गाद्वारे होणाऱ्या संसर्गापासून वाचवणार आहे. हे संशोधन महिलांना योनिमार्गाद्वारे संसर्ग निर्माण करणाऱ्या पेशिंना आणि एचआयव्हीच्या व्हायरसला अटकाव करते. एचआयव्हीच्या संसर्गाला आळा घालण्यासाठीचा प्रभावी उपाय म्हणून निरोधचा (कंडोम) वापर प्रामुख्याने केला जातो. पण, कॅनडातील वाटरलू विद्यापिठातील संशोधकांचा दावा आहे की, त्यांनी या उपायापेक्षा अगदी हटके शोध लावला आहे. या शोधानुसार एचआयव्हीच्या संसर्गाला आळा घालता येऊ शकतो.

 हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा वापर

दरम्यान, या शोधाबाबत 'जर्नल ऑफ कंट्रोल्ड रिलीज'मध्ये वृत्त प्रकाशित झाले आहे. यानुसार एम्पांटमध्ये हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा वापर केला गेला आहे. जे हळूहळू योनिमार्गाच्या नलिकेतील पेशिंच्या संपर्कात जाते. आणि पेशींभोवती अवरण तयार करते. 

एचआयव्हीचा धोका टळतो

वाटरलू विद्यापिठाचे प्रोफेसर एमेन्युएल हो यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, 'हे एप्लांट वापरल्यामुळे टी पेशी संक्रमण होण्यासाठी कोणताच प्रतिसाद देत नाहीत. ज्यामुळे व्हायरसचेही ट्रन्समिशन थांबले जाते.' एचआयव्हीचा व्हायरस टी पेशींना संक्रमित करतो. ज्याचा परिणाम शरीरावर होतो. या टी पेशींचा व्हायरस मानवी शरीरात प्रवेश करताच होणाऱ्या संसर्गाला विरोध करतात. ज्यामुळे एस्डचा धोका टळतो. 

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close