जिममध्ये जास्त वेळ व्यायाम करणाऱ्यांना असतो हा धोका

, ९० मिनिटांपेक्षा जास्त वेळ व्यायाम करणं धोकादायक ठरू शकतं.

Updated: Aug 31, 2018, 08:42 AM IST
जिममध्ये जास्त वेळ व्यायाम करणाऱ्यांना असतो हा धोका  title=

मुंबई : असंख्यजण आपल्या फिटनेसला घेऊन नेहमी चिंतेत असतात. खाण्याच्या अयोग्य वेळा, कामाचा ताण अशा अनेक गोष्टींमुळे शरीराकडे दुर्लक्ष होत असतं. आकर्षक फिटनेस आणि शरीर स्वास्थ्यासाठी व्यायामशाळेत जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. व्यायामाचा शरीरावर त्वरीत परिणाम दिसावा यासाठी जास्त वेळ, जास्त वजन उचलण्याची चूक अनेकजण करतात. यातून उद्भवणाऱ्या धोक्यांबद्दल आपण जाणून घेऊया... 

९० मिनिटं व्यायाम 

नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, ९० मिनिटांपेक्षा जास्त वेळ व्यायाम करणं धोकादायक ठरू शकतं. किती वेळ व्यायाम करायचा हे तुमच्या शारिरीक क्षमतेवरुन ठरतं. सर्वसाधारण शरीरयष्टी असलेल्यांनी आठवड्यातून ४ ते ५ दिवस व्यायाम करायला हवा. व्यायाम करताना मसल्सवर आलेला प्रेशर २ ते ३ दिवसांत रिलीज होतो. जर तुम्ही खूपचं वजनदार असाल तरी शारिरीक क्षमता समजून घेऊन व्यायाम करा.

ज्या दिवशी तुम्ही व्यायाम करणार नसाल तेव्हा तुम्ही जॉगिंग किंवा वॉकिंग करू शकता. याशिवाय योगासन आणि प्राणायमदेखील चांगला पर्याय आहे. तुमच्या शरीरात ताकद असेल तर नक्कीच जास्त वेळ व्यायाम करु शकाल. शारीरीक विज्ञानानुसार ९० मिनिटांपेक्षा जास्त वेळ व्यायाम करू नये. ९० मिनिटांनंतर १५ ते २० मिनिटांचा ब्रेक घ्या आणि पुन्हा व्यायामाला सुरूवात करा. व्यायाम करताना पाणी पिणंही महत्त्वाचं आहे.

मानसिक स्वास्थावर परिणाम 

जिममध्ये जास्त घाम गाळल्यास तुमच्या शरीरावर परिणाम होईल किंवा नाही होणार पण तुमचं मानसिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. एका संशोधनानुसार जास्त वेळ व्यायाम केल्यास मानसिक संतुलन बिघडत. यामुळे विचार करणं, समजून घेणं किंवा मतं मांडण्याची क्षमता कमी होते.