'या' टीप्सने कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येणार नाही

अनेक जण मोठ्या हौशीने जेवण बनवण्यासाठी सज्ज होतात.

Updated: Aug 21, 2018, 11:22 AM IST
'या' टीप्सने कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येणार नाही  title=

मुंबई : अनेक जण मोठ्या हौशीने जेवण बनवण्यासाठी सज्ज होतात. मात्र जेवणची तयारी करताना कांदा कापण्याची वेळ आली की अनेकांना नकोसे वाटते. कांदा कापताना डोळ्यातून पाणी येणं, डोळे चुरचुरणे अत्यंत त्रासदायक असते. त्यामुळे यापासून अनेकजण लांब पळतात. पण काही पदार्थांची लज्जतच कांद्यामुळे वाढते परिणामी कांदा कापणं अटळ असते. मग कांदा कापताना त्रास होऊ नये म्हणून या काही टीप्स नक्कीच तुम्हांला फायदेशीर ठरतील.  

कांदा कापताना डोळ्यांना त्रास का होतो? 

जेवणात लाल कांदा प्रामुख्याने वापरला जातो. कापल्यानंतर त्यामधील काही घटक वातावरणात पसरतात. शरीरात गेल्यास किंवा डोळ्यांजवळ या वेपर्स पसरल्यास त्रास होऊ शकतो. परिणामी डोळ्यात जळजळ होणं, डोळ्यातून पाणी वाहणं हा त्रास होऊ शकतो. 

कांदा कापताना त्रास होऊ नये म्हणून ...  

पाण्यात भिजवा

कांदा कापताना डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून त्याचे तुकडे करा. ताबडतोब हे तुकडे पाण्यात भिजवा. 5-7 मिनिटांनी हे तुकडे बारीक बारीक चिरावेत. 
कांदा पाण्यात भिजवल्याने त्यामुळे त्रासदायक घटक पाण्यातच विरघळतात. यामुळे डोळ्यांना त्रास होत नाही.  

च्युईंगम चघळा - 

कांदा कापताना च्युईंग गम चघळल्याने डोळ्यातून पाणी येत नाही. कारण च्युईंग चघळताना आपण तोंडाद्वारेही श्वास घेतो. परिणामी 

गरम पाणी -

कांदा कापल्यानंतर त्याचे तुकडे गरम पाण्याजवळ ठेवा. यामुळे कांद्यातून येणारे उग्र घटक रोखण्यास मदत होते.