'या' ५ गोष्टींवरून ओळखा भेसळयुक्त अंडी!

थंडीत अंडे खाणे आरोग्यासाठी लाभदायक ठरते.

Darshana Pawar | Updated: Dec 7, 2017, 01:36 PM IST
'या' ५ गोष्टींवरून ओळखा भेसळयुक्त अंडी!

नवी दिल्ली : थंडीत अंडे खाणे आरोग्यासाठी लाभदायक ठरते. तसेच अंडे खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. मात्र आजकाल अंड्यात देखील भेसळ झालेली दिसून येते. प्लास्टिकच्या अंड्याचा प्रकार काही दिवसांपूरर्वी उघडकीस आला होता. अशावेळी भेसळयुक्त अंडी कशी ओळखावी. कारण भेसळयुक्त अंड्यांमुळे तुमच्या बरोबर इतरांच्या आरोग्याचे नुकसान होईल. हे टाळण्यासाठी आणि योग्य अंडी निवडण्यासाठी काही खास टिप्स. 

अंड्याचं कवच 

भेसळयुक्त अंड्याचं कवच आगीच्या संपर्कात येताच पटकन आग पकडते. कारण ते प्लास्टिकसारख्या पदार्थापासून बनलेले असते. भेसळरहीत अंड्याच कवच पटकन आग पकडत नाही. मात्र काही वेळाने काळे पडते.

चमकदारपणा

आपण ओरीजिनल अंड पाहिलं तर ते चमकदार नसतं. मात्र भेसळयुक्त अंड तुम्हाला चमकदार दिसेल. त्यामुळे ते अधिक आकर्षक भासते.

स्मूथ कवच 

ओरीजिनल अंड्याचे कवच स्मूथ असते. तर भेसळयुक्त अंड हाताला रफ लागेल. 

आवाज 

अचूक अंडे ओळखण्यासाठी आवाज देखील महत्त्वाचा आहे. तुम्ही जर ओरीजिनल अंडे हलवून पाहीले तर त्यातून आवाज येत नाही. तर भेसळयुक्त अंड्यातून काहीतरी हलल्याचा आवाज येतो. 

अंड्यातील बलक 

जेव्हा तुम्ही ओरीजिनल अंड फोडता तेव्हा त्यातून पिवळा बलक बाहेर येतो. तर भेसळयुक्त अंड्यात पिवळ्या बलकासोबत व्हाइट फ्लूईड देखील दिसून येतो.