थंडीत 'अशी' घ्या हृदयाची काळजी!

थंडीत रक्तवाहिन्या, सांधे आखडले जातात. त्यामुळे रक्ताला पंपिंगसाठी अधिक कष्ट घ्यावे लागतात. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Jan 11, 2018, 05:35 PM IST
थंडीत 'अशी' घ्या हृदयाची काळजी!

मुंबई : थंडीत रक्तवाहिन्या, सांधे आखडले जातात. त्यामुळे रक्ताला पंपिंगसाठी अधिक कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे हृदयावर ताण येतो. अशा परिस्थितीत हृदयविकार असणाऱ्यांना अॅटक येण्याची शक्यता असते. त्याचबरोबर ज्यांना हृदयविकाराचा अंदाज नाही अशांसाठी हे धोकादायक ठरू शकते. म्हणून थंडीत हृदयाची काळजी घेण्यासाठी खास टिप्स.... 

  • शरीराचे तापमान योग्य राखा. म्हणजेच शरीराचे तापमान ३५ डिग्री सेल्सियस आणि ९५ डिग्री फारेनहाईटपेक्षा कमी असायला हवे. 
  • थंडीत शरीराचे तापमान योग्य राखण्यासाठी गरम कपडे घाला. त्याचबरोबर टोपी किंवा स्कार्फचा वापर तुम्ह करू शकता. 
  • हार्ट अॅटकची लक्षणे वेळीच जाणून घ्या. शरीराकडे नीट लक्ष द्या. थंडीत एकदा तरी आपल्या हृदयाची तपासणी करून घ्या. 
  • थंडीत आपल्या हृदयाची गती आणि ब्लड प्रेशर वाढते. त्यामुळे जर तुम्हाला हृदयविकार असल्यास औषधे वेळेवर घ्या. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरले.
  • अॅक्टीव्ह राहा. पण खूप जास्त शारीरिक मेहनत करू नका. थंडीच्या दिवसात तुम्ही दिवसभर पडून किंवा झोपून राहीलात तर रक्तसंचार योग्य पद्धतीने होणार नाही. त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या आणि स्ट्रोक होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे तासाभराने उठून जवळपास फिरा. खूप वेळ बसून राहू नका.
  • धुम्रपानासारख्या सवयी आणि उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल, मधुमेह सारख्या समस्या असल्यास विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.