चमकदार त्वचेसाठी असा करा मीठाचा वापर....

प्रत्येकालाच डागविरहीत, चमकदार त्वचा हवी असते.

Updated: Jun 7, 2018, 08:29 AM IST
चमकदार त्वचेसाठी असा करा मीठाचा वापर.... title=

मुंबई : प्रत्येकालाच डागविरहीत, चमकदार त्वचा हवी असते. यासाठी अनेक मुली ब्युटी प्रॉडक्ट्सची मदत घेतात. पण काही वेळेस याचे साईड इफेक्ट्सही होऊ शकतात. पण तुम्हाला माहित आहे का? स्वयंपाकघरातील काही पदार्थ सौंदर्यवर्धक असतात. आणि त्याचे काही दुष्परिणामही होत नाहीत. आपल्या दैनंदिन वापरातले मीठ. पदार्थाची चव वाढवणाऱ्या मीठाचे हे फायदे जाणून तुम्ही हैराण व्हाल. पाहुया मिठाचे काही जादूई फायदे...

१. उन्हाळ्यात त्वचेची चमक नाहीशी होते. उन्हामुळे त्वचा खूप लवकर डेड होते. निस्तेज झालेल्या त्वचेवर मीठ उपयुक्त ठरते. मीठाच्या वापरामुळे डेड सेल्स दूर होतात. मीठात ऑलिव्ह ऑईल, लव्हेंडर ऑईल, बदाम तेल घालून चेहऱ्यावर स्क्रब करा. काहीच मिनिटात याचा फरक दिसू लागेल. त्वचा स्वच्छ होईल. त्याचबरोबर मऊसूत आणि चमकदार होण्यास मदत होईल.

२. फक्त त्वचेची चमक परत आणण्यासाठीच नाही तर दातांची चमक टिकून ठेवण्यासाठीही मीठ अतिशय फायदेशीर आहे. यासाठी १ चमचा मीठात २ चमचे बेकिंग पावडर घाला. या मिश्रणात टुथब्रश घालून ते दातांवर लावा. असे नियमित केल्याने काही दिवसातच दातांचा पिवळेपणा दूर होईल.

३. तोंडातील बॅक्टेरीया नष्ट करण्यासाठी आणि श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी मीठाच्या पाण्याने चूळ भरा. काही वेळेस गुळण्या करा. असे केल्याने हळूहळू ही समस्या दूर होईल.

४. नखं चमकवण्यासाठीही मीठ फायदेशीर ठरते. १ चमचा मीठात चमचाभर लिंबाचा रस, बेकिंग सोडा आणि अर्धा कप कोमट पाणी घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट नखांवर लावा. काहीच दिवसातच नखं चमकू लागतील.