या गोष्टीकडे लक्ष द्या अन्यथा होऊ शकते किडनी फेल

Fri, 16 Nov 2018-12:47 am,

किडनी फेल होण्यामागची कारणे

मुंबई : किडनी निकामी होण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. अनेकांना अचानक जेव्हा या गोष्टीची माहिती तेव्हा अनेकांना प्रश्न पडतो की असं का झालं. जाणून घ्या काय आहे किडनी खराब होण्यामागची कारणे...


1. जास्त मीठ खाणं 


जास्त प्रमाणात मीठ खाल्याने त्याचा किडनीवर परिणाम होतो. मीठमध्ये सोडियम असतं ज्यामुळे ब्लड प्रेशर वाढतो. ज्याचा परिणाम किडनीवर होतो.


2. नॉनवेज खाणं


मटणमध्ये मोठ्य़ा प्रमाणात प्रोटीन असतं. पण जास्त प्रमाणात प्रोटीन डाइट घेतल्याने त्याचा परिणाम किडनीवर होतो. यामुळे किडनी स्टोनची समस्या देखील वाढू शकते.


3. औषधांचं जास्त प्रमाण 


छोट्या-छोट्या समस्यांवर अँटीबायोटिक किंवा पेनकिलर घेण्याची सवय किडनीवर परिणाम करतो. डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नये.


4. मद्यपान करणं


नियमित दारु पिल्याने त्याचा परिणाम किडनीवर होतो. लिवर आणि किडनीवर दारुचा विपरीत परिणाम होतो. कोल्ड ड्रिंक देखील किडनीसाठी हानिकारक आहे.


5. सिगरेट किंवा तंबाखू


सिगरेट किंवा तंबाखू हे देखील शरिरासाठी तितकच हानिकारक आहे. याच्या सेवनाने टॉक्सिंस जमा होतात. ज्यामुळे किडनी डॅमेज होते. याच्यामुळे बीपी देखील वाढतो. ज्यामुळे किडनी फेल होऊ शकते.


6. यूरिन थांबवून ठेवणे


लघवी थांबवून ठेवल्यामुळे ब्लॅडर फुल होतं. यूरिन रिफ्लॅक्सच्या समस्येमुळे किडनीवर जोर येतो. यामुळे  बॅक्टेरिया किडनीला इंफेक्शन करतात.


7. पाणी कमी किंवा जास्त पिणे


रोज 8-10 ग्लास पाणी पिणे खूप आवश्यक आहे. यामुळे शरीरातील टॉक्सिंस बाहेर पडतात. टॉक्सिंसचा किडनीच्या क्रियेवर परिणाम होतो. पण जास्त पाणी पिल्याने देखील त्याचा किडनीवर दबाव येतो आणि किडनी खराब होण्याची शक्यता असते.8. जास्त प्रमाणात खाणे 


सामान्य लोकांच्या तुलनेत किडनी खराब होण्याचं प्रमाण जाड व्यक्तींमध्य़े अधिक असतं. पोट भरुन खाणे किंवा मर्यादेपेक्षा अधिक खाणे यामुळे किडनीवर याचा परिणाम होतो. 


9. पूर्ण झोप न घेणे


रोज 7 ते 8 तास झोप घेणं आवश्यक असतं. कमी झोप घेतल्याने हाय ब्लड प्रेशर आणि हार्ट डिजीज सारख्या समस्या उद्भवतात. यामुळे किडनीवर परिणाम होतो.

Outbrain

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link