लग्नानंतर हनिमुनला जाण्याची सुरूवात कशी झाली?

काही वर्षांपूर्वी हनिमूनला इतके महत्व दिले जायचे नाही. मात्र, अलिकडील काळात हनिमूनला जाणे ही एक महत्त्वाची गोष्ट बनली आहे. पण ...

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Jan 3, 2018, 11:05 PM IST
लग्नानंतर हनिमुनला जाण्याची सुरूवात कशी झाली?

मुंबई: लग्न झाले की अनेकांना वेध लागतात ते, हनिमूनला जायचे. आजकाल हनिमूनला जाणे ही अगदीच सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. काही वर्षांपूर्वी हनिमूनला इतके महत्व दिले जायचे नाही. मात्र, अलिकडील काळात हनिमूनला जाणे ही एक महत्त्वाची गोष्ट बनली आहे. पण तुम्हाला माहित आहे का, हनिमूनला जायची सुरूवात कशी झाली?

हनिमूनच्या सुरूवातीबाबत दावे-प्रतिदावे

हनिमूनला जाण्याच्या सुरूवातीलबद्धल बर्ल्डवाईड वर्ल्ड्स बेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, हनीमून या शब्दाचा वापर पहिल्यांदा १६ व्या शतकात रिचर्ड ह्यूलोट यांनी केला. या शब्दाचा अलिकडील अर्थ असा की, लग्नानंत एकमेंकांना समजून घेण्यासाठी नवविवाहीत जोडप्याने काही काळ एकमेकांच्या सहावासात घालवणे. त्यासाठी जवळच्या नातेवाईकांपासून आणि दैनंदिन ताण-तणावापासून काहीसा आराम मिळविण्यासाठी एखाद्या पर्यटनस्थळी जाणे. असे केल्याने नव्या जोडप्यात एकोपा होतो व त्यांच्यातील प्रेमाला आकार येतो.
दरम्यान, काही मंडळींचे म्हणने असे की, हनिमूनचे मूळ हे ४००० वर्षांपूर्वीच्या बेबीलोनमध्ये जाते. जिथे विवाहीत जोडपे खास पद्धतीचे सरबत पीत असते. मात्र, या पद्धतीला हनीमून म्हटले जात असले तरी, हा शब्द १६ व्या शतकापर्यंत फार प्रचलीत नव्हता.

भारताकडूनच यूरोपला कळला 'हनिमून' हा शब्द

हनिमूनबद्धल आणखीही एक गंमतीदार गोष्ट अशी की, ही पद्धत आणि शब्द यूरोपीयनांना भारतीयांकडूनच शिकायला मिळाले, असा काहींचा दावा आहे. आठराव्या-एकोणिसाव्या शतकात युरोपीयनांनी पाहिले की, लग्नानंतर भारतीय तरूण-तरूणी एकमेकांच्या नातेवाईकांना जाऊन भेटत असतात. मात्र, त्यात पर्यटनाचा अभाव असे. युरोपीयनांनी त्याला पर्यटनाची जोड दिली आणि हनिमून जगभर प्रसिद्ध झाला.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close