... म्हणून भूक लागल्यावर राग अनावर होतो !

अनेकांना भूक अनावर होते. भूक लागल्यावर त्यांना ताबडतोब ती शमवण्यासाठी काहीतरी खायला हवे असते. अन्यथा तो राग इतरांवर निघण्याची शक्यता असते. पण नेमके असे का होते? या तुमच्या मनातील प्रश्नावर संशोधकांनी उत्तर दिलं आहे. 

Updated: Jun 18, 2018, 06:04 PM IST
... म्हणून भूक लागल्यावर राग अनावर होतो !  title=

मुंबई : अनेकांना भूक अनावर होते. भूक लागल्यावर त्यांना ताबडतोब ती शमवण्यासाठी काहीतरी खायला हवे असते. अन्यथा तो राग इतरांवर निघण्याची शक्यता असते. पण नेमके असे का होते? या तुमच्या मनातील प्रश्नावर संशोधकांनी उत्तर दिलं आहे. 

काय आहे संशोधकांचा दावा? 

अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिनाच्या संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार, खूप वेळ भूक लगाल्यानंतर तुम्हांला खायला न मिळाल्यास आपलं भावनांवरील नियंत्रण सुटतं. अनेकदा याच काळात आपल्या जगाबाबत असलेल्या विचारांचा प्रभाव भावनांमध्ये व्यक्त होतो. त्यामुळे अनेकदा राग अनावर होतो.  

ऑक्सफर्डने केला नव्या शब्दाचा समावेश  

भूक अनावर झाल्यानंतर येणारा राग शब्दात मांडण्यासाठी 'हॅंगरी' (हंग्री म्हणजे भूकेला आणि अ‍ॅन्ग्री म्हणजे रागावलेला)  हा नवा शब्द पुढे आला आहे. 'हॅंगरी' हा शब्द ऑक्सफर्ड शब्दकोषामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. याचा अर्थ भूकेमुळे येणारा राग असा होतो.  

इमोशन जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार, भूकेदरम्यान माणसांमधील भावनात्मक स्थिती आणि त्याच्याशी निगडीत मानसशास्त्र असा होतो. 

सुमारे 400 जणांवर प्रयोग केलेल्यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार, केवळ भूकेमुळे लोकांचा राग अनावर होत नाही तर त्याच्या जोडीला भावनात्मक स्थितीदेखील महत्त्वाची भूमिका पार पाडते. ज्या लोकांना आपल्याला खरंच भूक लागली आहे की नाही ? याचा पुरेसा अंदाज असतो त्यांच्यामध्ये भूकेमुळे राग येण्याचे प्रमाण कमी असते.