जागतिक हृदय दिवस : असे बनवा आपले हृदय निरोगी

आपले हृदय निरोगी ठेवण्याच्या काही टीप्स

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 29, 2017, 10:24 AM IST
जागतिक  हृदय दिवस :  असे बनवा आपले हृदय निरोगी title=

मुंबई : दररोज हजारो लोक हार्ट अटॅकने मरतात. त्यामूळे हृदयाची काळजी घेणे अतिशय महत्वाचे आहे. २९ सप्टेंबर हा जागतिक हृदयाची दिन म्हणून साजरा केला जातो. या अनुशंगाने आपले हृदय निरोगी ठेवण्याच्या काही टीप्स.. 

हृदयरोग टाळण्यासाठी, खाण्या-पिण्याची विशेष काळजी घ्यावी. अधिक तळलेले अन्न, तूप, लोणी, मीठ, मिरपूड आणि मिठाळी खाण्याने शरीरात कॅलरीज, कोलेस्ट्रॉल आणि चरबी वाढते. दर महिन्याला तेलदेखील बदला. एका महिन्यात मोहरीचे तेल आणि तर दुसऱ्या महिन्यात ऑलिव्ह ऑईलचा वापर करू शकता.
होमोसिस्टीन एक अमिनो अॅसिड आहे, जो प्रथिनांच्या पचनानंतरही शिल्लक राहतो. कोलेस्टेरॉलची पातळी वाढवून हृदयरोगाचा धोका वाढवतो. हे नियंत्रणात ठेवण्यासाठी व्हिटॅमिन बी ६, फॉलीक असिड आणि व्हिटॅमिन सी घ्या.
३० वर्षानंतर रक्तदाबाची नियमितपणे तपासणी केली पाहिजे. लठ्ठपणा असलेल्यांनी अशावेळी स्वत: ची काळजी घेणे आवश्यक आहे. हार्ट अटॅक शी संबंधित रुग्णांनाही सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.
सध्याच्या युगात अल्कोहॉल हे फॅशन मानले जाते. परंतु धूम्रपान आणि दारू पिण्याच्या सवयीमुळे हृदयाला नुकसान पोहोचते. हे टाळण्यासाठी आपण जीवन हे नशामुक्त आणि औषधमुक्त असणे आवश्यक आहे.
तुम्ही जर हृदय विकाराचे रुग्ण असाल तर तुमच्यासाठी योगा करणे फायद्याचे ठरेल. आपण कमीत कमी अर्धा तास योग करू शकता. हे कोलेस्टेरॉल, उच्च रक्तदाब, तणाव यासह अनेक समस्या काढून टाकते. तसेच, रक्ताभिसरण देखील चांगले राखण्यास मदत करते.