किडनीविकाराच्या रुग्णांना 'रेनाडिल' ठरणार नवी आशा

किडनी हा शरीरातील महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. मात्र डायबेटीस, लठ्ठपणा यासारख्या आजाराप्रमाणेच किडनीविकारही सायलंट विकार आहे. 

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Mar 7, 2018, 06:45 PM IST
किडनीविकाराच्या रुग्णांना 'रेनाडिल' ठरणार नवी आशा   title=

 मुंबई : किडनी हा शरीरातील महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. मात्र डायबेटीस, लठ्ठपणा यासारख्या आजाराप्रमाणेच किडनीविकारही सायलंट विकार आहे. 

 
 लक्षणांशिवाय वाढतात किडनी विकार   

 शरीरातून टाकाऊ पदार्थांना बाहेर टाकण्याचे काम किडनी करते. त्यामुळे वाढत्या वयानुसार किडनीवरील भारही वाढतो. मात्र पाच ट्प्प्यांमध्ये वाढणार्‍या किडनी विकाराची लक्षणं सुरूवातीच्या टप्प्यांमध्ये दिसत नाही. परिणामी अनेकदा किडनी विकार गंभीर स्वरूप धारण केल्यानंतरच लक्षात येतात. 

 
 डायलिसिस पुढे ढकलणं होणार शक्य 

 किडनीविकार हे अंतिम टप्प्यामध्ये पोहचल्यानंतर रुग्णांना अनेकदा डायलिसीस किंवा किडनी रिप्लेसमेंटची मदत घ्यावी लागते. मात्र रूग्नांनी वेळीच आरोग्याकडून मिळणार्‍या संकेतांकडे लक्ष दिल्यास क्रोनिक किडनी डिसीजच्या रुग्णांचे जीवनमान सुधारणं शक्य आहे.  

 'रेनडिल' ठरणार नवी आशा  

 सेंटॉर फार्मास्युटिकल आणि किबो बायोटेक यांच्या संयुक्त प्रयत्नांनी 'रेनडिल' हे फूड सप्लिमेंट बाजारात उपलब्ध होणार आहे. भारतात क्रोनिक किडनी डिसिजचे प्रमाण 17.2 % आहे. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.   

 'रेनडिल' कसं करणार काम   

  'रेनडिल' हे जागतिक स्तरावर पेटंटप्राप्त उत्पादन आहे. रेनाडिलमुळे नायट्रोजनस वेस्ट कमी होतात सोबतच डायलिसिस  करण्याची गरज पुढे ढकलली जाऊ शकते.  
  जगभरामध्ये 88% रूग्णांवर 'रेनडिल'ने सकारात्मक परिणाम दाखवले आहेत. रेनाडिलमुळे डायलिसिसवर असलेल्या,पाचव्या टप्प्यातील रुग्णांच्याही जीवनाची गुणवत्ता सुधारू शकते. त्यामुळे वेदनादायी आणि वेळखाऊ उपचारांऐवजी किडनीविकारग्रस्त रूग्णांना नवी आशा मिळणार आहे.  
  
  भारतामध्ये 'रेनडिल' पुढील 3-4 महिन्यात उपलब्ध होणार आहे.