संदीप कोचर द्वारा

मेष

Jul 18 2018

आजचा दिवस धावपळीचा ठरण्याची शक्यता आहे. आज तुमच्या बोलण्याला महत्त्व प्राप्त होईल. शिस्तबद्धरित्या काम करा.  

वृषभ

Jul 18 2018

आज महत्त्वाची बैठक होईल. यातील निरणय तुमच्यादृष्टीने महत्त्वाचा ठरेल. आजच्या दिवसाची सुरूवात संथ होईल. पण, नंतर नंतर उत्साह वाटू लागेल. लहान लहान उद्दिष्ट समोर ठेऊन आज काम केलंत, तर फायदा होईल.  

मिथुन

Jul 18 2018

आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी स्वतःची नेमकी पत दाखवण्याची संधी मिळेल. लोकांच्या मनात तुमच्याबद्दलचे विचार बदलतील. नवीन विचार, नवीन कल्पना इतरांसमोर मांडायला घाबरू नका. व्यापाराशी संबंधित भेटीगाठी फायद्याच्या ठरतील.  

कर्क

Jul 18 2018

आज कदाचित तुम्ही कुणालातरी उपदेशाचे डोस पाजाल. पण, तुमचं मार्गदर्शन त्या व्यक्तीला उपयोगी पडेल. इतरांच्या भावना, मूड्स याबाबत तुम्ही असतंत संवेदनशील असाल. आज वेगवेगळे प्रकल्प संपवण्याचा तुम्ही प्रयत्न कराल.

सिंह

Jul 18 2018

वेगवेगळया प्रकारच्या लोकांना हाताळावं लागेल. हे काम  काहीसं आव्हानात्मक ठरेल. आदर्शवादी किंवा ध्येयवेड्या व्यक्तिंच्या संपर्कात याल आणि आयुष्यात काहीतरी वेगळं करावं असं वाटू लागेल. एखाद्या कार्यक्रमात स्वयंसेवक म्हणून काम करायची संधी मिळेल.

कन्या

Jul 18 2018

एकादं काम वेळेत पूर्ण करायचं असल्यामुळे तुमचा आजचा सबंध दिवस या कामातच बिझी होईल. संध्याकाळी मित्र मंडळींसमावेत मौजसजा करायला मिळेल. आज तुम्ही फार संवेदनशील बनाल.संध्याकाळीही तुम्ही न थकता हास्य-विनोदात रमाल  

तूळ

Jul 18 2018

आज एखादं काम यशस्वीरीत्या पार करण्याचं ध्येय साकार होईल. एकदा कामातील अडथळ्यांची जाण आली की तुम्ही त्यातून सहज मार्ग काढाल. प्रकृतीची काळजी घ्या. लक्षात घ्या,  तब्येत ठणठणीत असेल तरच कामं करता येतील.

वृश्चिक

Jul 18 2018

मेडिटेशन करा आणि आज कितीजणांचे आशीर्वाद मिळवलेत हे मोजून पाहा. आपल्या वेळापत्रक नक्की करू नका. काहीही बदल घडू शकतात. आपल्या कामातून तुम्ही इतरांची वाहवा मिळवाल.

धनु

Jul 18 2018

कामात यश मिळवण्यासाठी तुम्हाला अधिकाधिक मनमोकळं आणि क्रिएटिव्ह व्हावं लागेल. आज सकारात्मक ऊर्जा जाणवेल. प्रणयाराधनासाठी चांगली संधी. संध्याकाळच्या सुमारास स्त्रीमुळे भाग्यवान ठराल.

मकर

Jul 18 2018

मालमत्ता, रिअल इस्टेटसंबंधीच्या व्यवहारांसाठी चांगला दिवस. प्रॉपर्टीशी संबंधित एखादा व्यवहार करायचा असल्यास आज काम चांगलं होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता. तुमच्या कामामुळे आज इतर लोकांना प्रेरणा मिळेल.

कुंभ

Jul 18 2018

आज नवा उत्साह संचारेल. नवा व्यापार सुरू करण्यास उत्कृष्ट दिवस. आज लोकांवर तुमची छाप पडेल. पण, दिवसा अखेरीस तुम्ही आपल्या आसपासच्या लोकांना कंटाळाल. एखाद्या सुट्टीची स्वप्नं पाहाल. आज होईल असं वाटणारं काम शेवटच्या क्षमी फिस्कटण्याची शक्यता

मीन

Jul 18 2018

आजचा दिवस हा काही प्रमाणात उपचारांसारखा ठरेल. कुठल्या गोष्टी या ठरल्याप्रमाणे घडत नाहीत, याचं विश्लेषण करा आणि त्या गोष्टींचा जास्त विचार न करता पुढील वाटचाल करा.आज तुमच्या बुद्धीमत्तेला वाव मिळेल. तुमचा आत्मविश्वासामुळे तुमचे नेतृत्व गुण उजळतील.

मेष

Jul, 2017

तुमच्या बुद्धिच्या जोरावर तुम्ही आर्थिक प्रगती करू शकाल. भावंडांकडून सौख्य मिळेल... कौटुंबिक स्वास्थ्य अनुभवू शकाल. जोडीदारासाठी आणि इतर नातेवाईकांसाठी खर्च कराल.  शहराबाहेर फिरायला जाण्याची शक्यता आहे. विद्यार्थी वर्गाला थोडी मेहनत घ्यावी लागेल. मुलांसोबत तुमचे संबंध सामान्य राहतील. सार्वजनिक जिवनात सन्मान मिळेल. वैवाहिक जीवनात नैराश्य येऊ शकतं.  मल्टिनॅशनल कंपन्यांशी निगडीत लोकांना हा काळ काही चांगला नाही. वीजेसंबंधी कार्यात सावधानता बाळगा. 

वृषभ

Jul, 2017

राशीच्या लोकांसाठी हा महिना खूपच व्यस्त असेल. पण, आयुष्यात फार काही मोठा फरक पडणार नाही. जुलैच्या पहिल्या आठवड्यात मधुर संभाषणानं तुम्ही लोकांची हृदय जिंकाल. कौटुंबिक सुखाचा वर्षाव तुमच्यावर होणार आहे. नवे कपडे आणि दागिन्यांची खरेदी कराल. बुद्धिपूर्वक साहस तुम्ही करण्याची शक्यता आहे. खेळांमध्ये अधिक रस घ्याल.ही वेळ संतान प्राप्तीसाठी उत्तम वेळ आहे. महिन्याच्या उत्तरार्धात अनावश्यक खर्च टाळा. नोकरी-धंद्यात गुप्त शत्रुंपासून सावधान... विद्यार्थी प्रगतीपथावर राहतील. आरोग्याला थोडं सांभाळा  

मिथुन

Jul, 2017

या राशीच्या व्यक्तींची आर्थिक भरभराट होण्याची शक्यता आहे. विदेश संबंधीत कार्यात सुरूवातीला थो़डे अडथळे आले तरी त्या कार्यात यश आहे. सरकारी आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी गैरव्यवहारापासून थो़डे जपून राहावे. 17 तारखेनंतर वडील किंवा वडीलधाऱ्यांकडून लाभ संभवतो. महिनाच्य़ा मध्यावर दुर्घटना किंवा वाद होण्याची शक्यता आहे. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. आर्थिक फायदा होण्यासाठी हा महिना फारच उपयुक्त आहे. विद्यार्थीवर्गासाठी हे दिवस लाभदायक आहे. 

कर्क

Jul, 2017

आर्थिक प्रकरणांसाठी महिन्याचा सुरुवातीचा काळ खुपच अनुकूल आहे. निष्काळजीपणामुळे व्यावसायात थोडं नुकसान सोसावं लागू शकतं. तुमच्या चेहऱ्यावरचं तेज वाढेल. या दरम्यान तुमच्या कुटुंबाकडून आणि मित्रांकडून महागडे गिफ्टस मिळण्याची शक्यता आहे. स्थायी संपत्तीच्या खरेदी-विक्री कार्यासाठी हा अनुकूल वेळ आहे. अनावश्यक आणि अनैतिक कार्यांत खर्च आणि वेळ टाळा.  

सिंह

Jul, 2017

या महिनाच्य़ा प्रारंभी उद्योगधंद्यात प्रगती होईल पण त्यासाठी घाईघाईने निर्णय घेऊ नका. विचार करा आणि मगच कृती करा. वडिलांकडून लाभाची शक्यता आहे. कृषी, रसायन, प्रिटिंग, संशोधनसारख्या क्षेत्रात खूप प्रगती करू शकता. प्रकृतीबाबत काही कुरबुरी जाणवतील. घरात मंगल कार्ये घडतील. नोकरीपेक्षा उद्योगधंद्यात जास्त प्रभाव पाडाल. 17 तारखेनंतर कोर्टाची रखडलेली कामे पार पडतील.  

कन्या

Jul, 2017

या महिनाच्य़ा सुरूवातीलाच मनोरंजन तसेच आरामदायी आयुष्यासाठी खर्च केला जाईल.  या राशीच्या व्यक्ती अध्यात्मात रुची घेतील. या महिन्यात घरात शुभकार्य घडेल. प्रवास लाभदायक होईल. ज्या व्यक्ती विदेशी जाण्यासाठी उत्सुक असतील त्यांच्या कार्याला गती मिळेल. बॅकिंग, फाइनान्स, अॅक्टिंग तसेच वकिली क्षेत्रात प्रगती कराल. अविवाहित व्यक्तींना योग्य जीवनसाथी मिळण्याची शक्यता आहे. महिनाच्य़ा शेवटी आर्थिक भरभराट होण्याची शक्यता आहे.

तूळ

Jul, 2017

या महिन्याच्या सुरुवातीला वैवाहीक जीवनात थोडीशी निराशा येण्याची शक्यता आहे. घरातील वडील तसेच ज्येष्ठांमुळे खर्च जास्त होईल. एकादी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळ तुम्ही सावधानता बाळगा. तसेच गणपतीची आराधना करा. आपल्याला भाग्याची साथ मिळेल. महिन्याच्या पहिला आठवड्यात तुमची कल्पना शक्ती चांगली होईल. सौंदर्य प्रसाधने, स्पा, अभिनय यापैकी एखाद्या क्षेत्राशी संबंधीत काम कराल. यातून तुम्ही प्रगती साधाल. महिन्याच्या मध्यात तुम्ही आध्यात्मीक गोष्टीला प्राधान्य द्याल. पुत्र प्राप्तीबाबत तुम्ही चिंतीत राहाल. तसेच आपल्याला अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी महिलांना त्रास होण्याची शक्यता आहे. आपल्या चंचलतेत वाढ होईल. अभ्यासात यश मिळेल.  गुरु आपल्या कर्म स्थानात येत आहे. त्यामुळे व्यावसायिक प्रगतीचे संकेत मिळत आहेत.

वृश्चिक

Jul, 2017

महिन्याची सुरुवात चांगली आहे. तुम्ही जास्तीत जास्त पैसे मिळवाल. मात्र, आपल्या हातात काहीही उरणार नाही. कारण तुम्ही जरुरीपेक्षा जास्त खर्च कराल. आपला वेळ अशांतेत आणि अपमानित होण्यात खर्ची पडत आहे. त्यामुळे तुम्ही अध्यात्माची कास धराल. यातून तुम्ही योग साधना कराल. याचा लाभ आपल्याला मिळेल. तुम्ही शारीरिक दृष्ट्या थोडेसे कमजोर व्हाल. याची चिंता तुम्हाला सतावेल. महिन्याच्या पूर्वाधात कोणत्याही मोठ्या लाभाची अपेक्षा ठेवू नका.  भाऊ-बहीण यांच्याबाबत संबंध अधिक नाजूक राहतील. त्यामुळे कोणताही व्यवहार करताना काळजी घ्या. तुम्ही एकादी कलात्मक गोष्ट कराल. सौंदर्य, फर्निचर, कलात्मकता याबाबत तुमची आवड असेल. त्यासाठी तुम्ही वेळ काढाल. महिन्याच्या उत्तरार्थ तुम्हाला कौटुंबीक सुख मिळेल. महिला तसेच मित्रांकडून तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहे. पुत्रप्राप्तीसाठी ही वेळ चांगली आहे. ज्यांच्या विवाहाची बोलणी सुरु आहेत. त्यांच्यासाठी सुरूवातीला वेळ थोडीशी कठिण आहे.    

धनु

Jul, 2017

उत्तम दाम्पत्य सुख, मनोरंजन, आर्थिक प्रगती या महिन्याच्या सुरूवातीला तुम्हांला मिळणार आहे. प्रेमासाठी चांगला काळ आहे. या काळात तुम्ही प्रपोज करू शकतात. आपल्या वैवाहीक संबंधात आनंद मिळेल. भागीदारीसाठी पहिला आठवडा चांगला आहे. सात तारखेनंतर तुम्हांला सासरच्या माणसांकडून लाभ होईल. पतीला पत्नीकडून लाभ होईल. नोकरीत तुमचा तापट स्वभावावर नियंत्रण ठेवा. आपल्या बुद्धीमत्ता आणि बळाच्या आधारावर पुढे जा. १७ तारखेनंतर सरकारी कार्यात अडचणी येणार नाही, याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस आहे. 

मकर

Jul, 2017

राशीच्या लोकांना या महिन्यात वैवाहिक संबंध तसेच संबंधाबाबत कार्यात मजा येणार नाही. आपला राग प्रगतीत बाधा आणू शकतो. आपण वाचण्यासाठी वेळ द्याल. नोकरीत आपली प्रतिमा चांगली राहिल. वरिष्ठ आपली प्रशंसा करतील. तसेच पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. तसेच आपल्याला नवी संधी मिळण्याची अधिक शक्यता आहे. सासरकडून आणि पत्नीकडून आपल्याला लाभ होण्याची शक्यता आहे. महिन्याच्या पहिला आठवड्यात आपल्याला भाग्य लाभ होईल. १४ तारीखनंतर अधिक लाभ होण्याची शक्यता आहे. आपल्याला मित्र तसेच ओळखीच्या व्यक्तींकडून सहकार्य मिळेल. महिन्याच्या उत्तरार्थ विरोधक तुमच्याबाबत आक्रमक होतील. त्यामुळे विरोधकांपासून दूर राहा. तुम्ही यात्रा तसेच प्रवास करणार असलातर स्थगित करा. २१ तारीखनंतर वैवाहिक जीवनात अधिक निराशा येऊ शकते. पुत्राचे सुख मिळेल. धार्मिकतेत रुची घ्याल.    

कुंभ

Jul, 2017

महिन्याच्या सुरूवातीला कुटुंबियांशी नम्रतेने वागा. पुत्र सुखासाठी चांगला काळ आहे. व्यावसायात चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. महिन्यात हळूहळू आनंद वाढत जाणारा आहे. आई वडिलांशी चांगले संबंध राहतील. नोकरी विरोधकांवर विजय मिळवाल. विद्यार्थ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीन वागले पाहिजे. २१ तारखेनंतर यश मिळण्याची शक्यता आहे. आपल्या प्रिय व्यक्ती प्रपोज करू शकता. 

मीन

Jul, 2017

 राशीतील व्यक्तींसाठी हा चांगला महिना आहे. आर्थिक प्रगतीसोबत कौटुबिक सुखात वृद्धी होईल. सात तारखेनंतर तुमचे वैवाहिक जीवनात आनंद निर्माण होईल. आपल्या नातेवाईकांना खूश करण्यासाठी खर्च होऊ शकतो. गर्भवती महिलांनी या काळात सावधानता बाळगली पाहिजे. महिन्यात पहिल्या आठवड्यात नोकरीत प्रगतीची शक्यता आहे. परंतु महिन्याच शेवटी सावधानता बाळगा. कला क्षेत्रात चांगल्या संधी मिळतील.   

मेष : तुमचे स्टार आहेत बदल कायम ठेवा

2018

हे वर्ष आपल्यासाठी बदल घेऊन येणारं आहे. यासाठी सकारात्मक उर्जा तुमच्यामध्ये कायम ठेवा, तसेच त्यावर लक्ष केंद्रीत करा. या वर्षात तुमच्या मार्गात ज्या पण गोष्टी येणार त्यांच्याकडे सकारात्मक नजरेने पाहायला शिका. या राशीच्या लोकांमध्ये पहिल्या सहा महिन्यात भूमिका आणि जबाबदारींमध्ये बदल दिसून येणार आहे. व्यवसायाशी संबंधीत लोकांनी गरज पडल्यास आपल्या व्यवसायाच्या कार्यपद्धतीत बदल घडवून आणा. कारण ऑगस्टनंतर काही पॉझीटीव्ह घटना घडणार आहेत. आपल्या कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायातील विरोधकांपासून सावधान राहा. विचार करून निर्णय घ्या. आपल्यावर प्रेम करणाऱ्यांवर तुम्हीही प्रेम करा आणि त्यांना जाणीव करून द्या की ते तुमच्या जीवनात किती महत्त्वाचे आहेत. ज्यांच्या आयुष्यात प्रियकर आणि प्रेयसी आहेत, त्यांच्या लग्नाचा योग आहे. हा बचत करण्याचा योग्य काळ आहे. तुमच्या खर्चाचं प्लानिंग करा तुम्हांला फायदा होईल.  मेष राशीवाल्यांनी एक आरोग्यदायी लाइफस्टाइलला फॉलो करा तसेच नियमीतपणे व्यायाम करा. वृद्धांनी आणि मध्यमवयीन लोकांनी नियमीत आरोग्य चाचणी करा. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपल्या वडिलांना किंवा वरिष्ठांचा सल्ला घ्या. ध्यानधारणा, प्रार्थना आणि धार्मिक यात्रांनी तुमच्या बदल दिसून येईल. 

वृषभ - मोठे व्हायला आणि अचंबित करणाऱ्या घटनांना तयार राहा...

2018

हे वर्ष तुमच्यासाठी सर्वप्रकारे खूप प्रभावशाली असणार आहे. या वर्षात तुमच्या आयुष्यात काही अनियोजित घटना घडणार आहेत. अचानक अचंबित करणाऱ्या गोष्टींशी तुमचा सामना होऊ शकतो. मोठे होण्यासाठी तुमच्यातील योग्यता अनेक कसोट्यांना मागे टाकून तुम्हांला टॉपवर जाण्यास मदत करेल. जेव्हा कधी गरज पडली तेव्हा स्वतःच्या मानसिकतेवर भरवसा ठेवा आणि यावेळी दुसऱ्यांचा सल्ला घेऊन निर्णय घ्या.  यावर्षात तुमची प्राथमिकता तुमचा मुलगा असणार आहे. त्यामुळे त्यांच्या संगोपनावर अधिक ध्यान केंद्रीत करा. कुटुंब वाढविण्याची इच्छा असणाऱ्या जोडप्यांसाठी हा काळ चांगला आहे. अविवाहीत लोकांच्या जीवनात नवीन घटनाक्रम किंवा रोमान्स येऊ शकतो. शांततेने आणि संयमाने काम घ्या. नोकरी धंद्यातील लोकांनी कामाशी निगडीत घटनांचा योग्य स्वीकार करा. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना सावधानता बाळगा.  रिअल इस्टेट, स्टॉक आणि मार्केट्सशी संबंधीत लोकांसाठी नव्या वर्षातील दुसरा हिस्सा खूप चांगला जाणार आहे. वर्षातील दुसऱ्या सहा महिन्यात आपल्या आई आणि वडीलधाऱ्यांची अधिक काळजी घ्या. 

मिथुन - वर्ष प्रेमाचे...

2018

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी २०१७ ची सुरूवात पैशाच्या दृष्टीने लाभदायक असणार आहे. तुमच्या सर्व गरजा पूर्ण होतील. याचा फायदा घ्या. ज्या व्यक्ती रिअल इस्टेट, ऑटोमोबाईल, परिवहन आणि लॉजिस्टीक बिझनेसमध्ये आहे, त्यांना खूप फायदा होणार आहे. त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने याचा फायदा करा. या व्यवसायांमध्ये तुमचे वाकचातुर्य आणि रणनितीने फायदा करून घ्या.  मिथुन राशीचे लोक सेल्स आणि मार्केटिंग, संचार आणि कला  क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी आपल्या क्षमतांचा योग्य वापर करून आपल्या फिल्डमध्ये स्वतःचे अस्तित्व निर्माण करा. या वर्षी मिथुन राशीवाल्यांची ग्रह दशानुसार त्याचे भाऊ बहिण त्याची ताकद आणि कमजोरी बनू शकतात. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन आणि मदत अपेक्षित असेल तर ती घेण्यास मागेपुढे पाहू नका. तुमच्यासाठी फायद्याचे राहील.  या वर्षात या राशीच्या लोकांनी आपल्या कुटुंबाना आणि प्रिय व्यक्तींवर लक्ष्य द्या. ते तुमच्या शक्ती आणि स्थिरतेचा स्त्रोत आहे. मिथुन राशीच्या व्यक्ती प्रेमात असतील ते आपल्या साथीकडून खूप प्रेम आणि काळजीची इच्छा करतात. त्यांना ध्यान द्या.  जास्तीत जास्त वेळ त्यांच्यासोबत घालवा. त्यांच्या गरजा लक्षात घेऊन काळजी घ्या. या राशीच्या लोकांनी नियमित व्यायाम आणि आपल्या खाण्या पिण्यावर लक्ष्य द्या. मिथुन राशीच्या लोकांनी योग आणि गोलवर ध्यान केंद्रीत करा. तसेच उर्जा सकारात्मक विचारांमध्ये आणि त्यांना व्यवहारात अमलात आणण्यासाठी प्रयत्न करा. 

कर्क - चांगल्या गोष्टी करणार तुमचे स्वागत

2018

कर्क राशीच्या व्यक्तींनी तुमच्या कार्यात घडणाऱ्या घटना आणि संधीनी तुमच्या पुढे जाण्यास मदत मिळणार आहे.  तुमच्या कठोर मेहनतीसाठी तुमची प्रशंसा होईल, तसेच पुरस्कारही मिळेल. तुमच्या राशीतील चंद्र तुम्हांला अधिक संवेदनशील बनवणार आहे. छोट्या गोष्टींमध्ये चिंता करू नका. तुम्ही सर्व आव्हांनाचा सामना करू शकतात. तुमचे विरोधकही या गोष्टीची प्रशंसा करतील.  कर्क राशीच्या व्यक्तींनी २०१७ मध्ये आपल्या प्रिय व्यक्तिंशी संघर्ष टाळा. या राशीच्या व्यक्तींनी कामाच्या ठिकाणी सावधानता बाळगा. घाईत भागीदारी करताना सावध राहा. शांत राहा आणि तुमच्यावर प्रभाव करणाऱ्या गोष्टीपासून दूर राहा आणि निर्णय घ्या.  या राशीच्या लोकांमध्ये पहिल्या तीन महिन्यात गुरू तुमच्या भावा बहिणांना खूप जवळ आणणार आहे. त्यांच्या मदतीने खूप कामे पूर्ण होणार आहे. दुसऱ्या सहा महिन्यात आपल्या कुटुंबाकडे, धन आणि कौटुंबिक संपत्तीकडे अधिक लक्ष द्या.  कर्क राशीच्या लोकांनी रिअर इस्टेट, शेअर आणि सट्ट्यापासून दूर राहा. चांगल्या नियोजनाने तुमच्या अनपेक्षीत लाभ मिळू शकतो.  या वर्षात विवाहीत आपल्या जीवनसाथीला चांगल्या प्रकारे समजू शकतील. अविवाहीत लोकासाठी लग्नाचा चान्स अधिक आहे. कर्क राशीच्या लोकांसाठी हे वर्ष चांगले जाणार आहे. 

सिंह - अकल्पित घडण्याची शक्यता

2018

या नवीन वर्षात अनेक अकल्पित आणि अनपेक्षित घटना तुमच्या आयुष्यात घडण्याची शक्यता आहे. वर्षाच्या मध्यात तुम्ही तुमचं करिअर, सामाजिक मान-सन्मान मिळवू शकाल. वेगवेगळ्या लोकांशी तुमची भेट होईल. त्यांच्याकडून तुम्हाला अनेक गोष्टी शिकायलाही मिळतील. परंतु, तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा... आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करा. घरात शांतता कायम ठेवण्यासाठी आपल्या कुटुंबावर आणि मुला-बाळांवर लक्ष ठेवा. जीवनात येणाऱ्या बदलांचा स्वीकार करा. चिंता तुम्हाला आक्रमक बनवू शकते. विरोधकांकडून तुमचा आत्मविश्वास खच्ची करण्याचा प्रयत्न होईल... परंतु, तुम्ही विचलीत होऊ नका. आपल्या रोमान्टिक आयुष्यावर अधिक लक्ष केंद्रीत करा... नको त्या गोष्टींचा हव्यास टाळा. व्यापार आणि करिअरमध्ये तुम्हाला यश प्राप्त होईल. 

कन्या - नवं प्रेम आयुष्यात येईल

2018

2017 मध्ये तुमच्या कौटुंबिक आयुष्यात अनेक बदल होऊ शकतात. शेअर, ट्रेडिंग किंवा व्यापाराला सुरुवात करायची असेल तर ऊर्जेसहीत तयार राहा.  अनावश्यक जोखिम टाळा. आपला मार्ग योग्य असेल याची काळजी घ्या. मानसिक आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या मुलांना तुमची गरज असेल तेव्हा त्यांच्यासोबत उपस्थित राहा.  अविवाहितांच्या लग्नाचे योग संभवतात. विवाहीत लोकांना आपल्या नात्याकडे डोळे उघडे ठेऊन पाहणं गरजेचं आहे. आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. 2017 मध्ये शेअर बाजारात गुंतवणूक करताना काळजी घ्या.  

तूळ : तुमच्या वागण्या-बोलण्यानं जग जिंका

2018

तूळ राशीच्या व्यक्तींसाठी नवीन वर्ष अत्यंत सुखावह राहील. अनेक समस्यांना बाजुला सारून तुम्ही जग जिंकू शकाल... आणि यश मिळवू शकाल.  नव्या वर्षात नव्या संधी तुमची वाट पाहात आहेत... गरज आहे ती सकारात्मक प्रयत्नांची... 2017 चे पहिले सहा महिने तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरतील. व्यक्तीगत आणि व्यावसायिक जीवनात यश तुम्हाला मनोमन सुखावेल. तुमचा जोडीदार तुमची ताकद बनून जगासमोर येईल.  परंतु या वर्षात तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. मित्रांची निवड करताना सावधानी बाळगा. तुमचं व्यक्तीत्व इतरांपेक्षा तुम्हाला वेगळं ठरवेल. तुमच्या सगळ्या आशा-आकांक्षा यंदा पूर्ण होण्याचे योग आहेत. त्यामुळे गोष्टी ठरवा आणि त्या पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा.

वृश्चिक

2018

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना २०१६ हा खासगी जीवनात आणि नोकरी पेशात कभी खुशी कभी गम असा राहणार आहे. या राशीच्या व्यक्तींनी जरा जास्त जागरूक राहण्याची गरज आहे. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आपल्या आईशी सौदर्याचा कायम राखा.  या वर्षी तुम्हांला तुमच्या मूळ गावातून यात्रेचा योग आहे. रिअल इस्टेट आणि जमिनीचा सौदा करताना जरा सावधनता बाळगा.  या राशीचे व्यक्ती आपल्या बोलण्याच्या कलेले शत्रूवरही विजय मिळवू शकतील.  तुम्ही स्वतःला अशा पद्धतीने प्रेसेंट करा त्यामुळे तुमच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्ती तुमच्यावर विश्वास ठेवतील आणि वाईट प्रसंगी तुमच्या सोबत राहतील.  वर्षाच्या दुसऱ्या सहा महिन्यात तुमच्या जीवनात अनेक लाभकारी परिणाम दिसून येतील. करिअर, परिवार आणि पेशात तुम्हांला सफलता मिळेल. या दरम्यान तुम्हांला अचानक धन प्राप्ती होईल.  या दरम्यान तुमचा सामाजिक लौकिक वाढले आणि तुम्हांला विदेशात जाण्याची संधी निर्माण होईल. आपल्या कार्यालयातील वरिष्ठांशी बोलताना जरा सावधानता बाळगली पाहिजे. 

धनू : आत्मपरिक्षण करण्याची वेळ

2018

धनू राशीच्या लोकांसाठी 2017 हे वर्ष आत्मपरिक्षण करण्याचं आणि बदलाचं असणार आहे. या वर्षामध्ये तुम्हाला अनेक नव्या गोष्टी शिकण्यासाठी लक्ष केंद्रीत करावं लागेल. या नव्या गोष्टींचा वापर नवी उंची गाठण्यासाठी होऊ शकेल.  आर्थिक दृष्टीनं हे वर्ष तुमच्यासाठी तंगीचं राहिल. यंदाच्या वर्षी कुटुंबाची मात्र तुम्हाला चांगली साथ मिळेल. पत्नी आणि आईकडून तुम्हाला ताकद मिळेल. स्पर्धेमध्ये तुमची चमक थोडी कमी राहिल, पण कुटुंबासोबत असताना तुम्ही प्रभाव पाडू शकाल.  स्वत:मध्ये बदल केल्यानंतर पार्टीमध्ये तुम्ही आकर्षणाचं केंद्र ठरू शकाल. कुटुंबाची देखभाल करणं तुमच्यासाठी लाभदायक असेल. यंदाच्या वर्षी तुम्ही नवे मित्र तर बनवालच पण जुन्या मित्रांचीही साथ लाभेल.  वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये आरोग्याशी निगडीत समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. त्यामुळे तब्येतीला जपा आणि आराम करा. आर्थिक करार आणि गुंतवणूक करताना सावध राहा. शुक्र तुम्हाला खर्च करण्यासाठी उचकवू शकतो. वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये तुमचा जास्त खर्च होईल. 

मकर : वेळ तुमचीच आहे पण कुटुंब आणि आध्यात्मिकतेवर लक्ष ठेवा

2018

2017मध्ये तुमच्यासोबत चांगल्या गोष्टी होतील. कुटुंबाची सुरक्षा ही तुमची प्राथमिकता असेल. यंदाच्या वर्षी तुम्हाला धन प्राप्तीचा योग आहे. याबरोबरच आध्यात्मिकतेवर लक्ष द्यायची आवश्यकता आहे. यंदाच्या वर्षी नव्या पार्टनरशिप करण्याची संधी आहे. या पार्टनरशिप तुम्हाला फायदा देतील.  या वर्षात तुमचं करिअर तुम्हाला पुढे नेईल. वाद संपतील आणि प्रेम वाढेल. 2017मध्ये आयुष्याचा साथीदार मिळेल. मित्र आणि कुटुंबाकडून कौतुकाचा वर्षाव होईल. व्यवसाय आणि परदेशी गुंतवणूक तुमचं भविष्य सुखकर करेल. तब्येतीच्या छोट्या समस्या भेडसावू शकतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. या वर्षी प्रेम ही तुमची पहिली प्राथमिकता नसेल. एकूणच या वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी संथच असेल. 2017 हे वर्ष तुम्हाला बदलेल. तुम्हाला राग आणि तणावावर नियंत्रण ठेवावं लागेल. दुसऱ्या सहा महिन्यांमध्ये तुमचं करिअर पुढे जाताना दिसेल. त्यामुळे सुरुवातीच्या संथ गतीमुळे निराश होऊ नका. कठीण काळ तुम्हाला एक चांगला माणूस बनवेल. 

कुंभ- यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल

2018

2017मध्ये यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत करावी लागणार आहे. ध्येय गाठण्यासाठी प्लॅनिंगबरोबरच योग्य तयारीही करावी लागणार आहे. 2017 मध्ये जून महिन्यानंतर सेलिब्रेशन करण्याची संधी मिळू शकते.  यंदाच्या वर्षी नव्या लोकांची मिळालेली साथ तुमच्यासाठी लाभदायक असेल. परदेशामध्ये जायचा योग असल्यानं पासपोर्ट आत्ताच बनवून घ्या. 2017च्या दुसऱ्या टप्प्यामध्ये परदेशात जायचा योग जास्त आहे.  कोणत्याही परिस्थितीमध्ये शॉट कटचा अवलंब करू नका. मेहनत करूनच ध्येय गाठण्यावर लक्ष केंद्रीत करा. कुटुंबाचीही मदत घ्या. संपत्तीची योग्य ती काळजी घ्या आणि कोणावरही अंध विश्वास ठेवू नका. यंदाच्या वर्षी अचानक लाभ होण्याची संधी असली तरी अकस्मात हानी आणि खर्च होण्याचीही शक्यता आहे.  शुक्र तुमच्या मनातील रचनात्मक विचारांना भर देईल. यावर्षी तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. 2017 हे वर्ष तुमच्यासाठी उर्जा प्रदान करणारं असणार आहे. यंदाच्या वर्षी तुमची स्वप्न पूर्ण होतील. रिलेशनशीपवर फोकस करणं गरजेचं आहे. यंदा तुमचा पगार वाढण्याची आणि प्रमोशन मिळण्याची उत्तम संधी आहे.

मीन- कुटुंब आणि पार्टनरशीपवर लक्ष केंद्रीत करा

2018

2017 हे वर्ष तुमच्यासाठी आधी केलेल्या मेहनतीचं फळ मिळवणारं असेल. या वर्षी आत्मपरिक्षण करा आणि कौटुंबिक गोष्टींसाठी जास्त वेळ द्या. इच्छुकांचा या वर्षी लग्नाचा योग जुळून येऊ शकेल.  प्रचंड मेहनत केल्यानंतरच विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळेल. करिअर चांगलं बनवण्यासाठी हे वर्ष उत्तम असेल. स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी मेहनतीला पर्याय नाही.  बुधाच्या प्रभावामुळे आयुष्यात सकारात्मक बदल होतील. या उर्जेचा वापर शिकण्यासाठी आणि संवादाची क्षमता वाढवण्यासाठी करा. या वर्षी सामाजिक कार्यामध्ये सहभागी व्हायचे योग येतील. यामुळे समाजातील तुमची प्रतिष्ठा वाढायला मदत होईल.  गुरू तुमच्या आयुष्यात आनंद आणि लग्नाचा योग घेऊन आला आहे. आपल्या प्रिय व्यक्तींवर जास्त लक्ष केंद्रीत करा आणि अनावश्यक त्रासापासून बाजूला राहण्याचा प्रयत्न करा. व्यवसायातील वृद्धी आणि वैयक्तिक खर्च तुम्हाला दबावात आणू शकतात. साथीदाराकडून आधीपेक्षा यंदा जास्त सहयोग मिळेल.  प्रेमातून अधिक संतुष्टता मिळणार असली तरी साथिदाराच्या तब्येतीमुळे थोडा त्रास होऊ शकतो. हे वर्ष तुम्हाला काही आव्हान घेऊन येणारं आहे. ही आव्हानं पेलणं कठीण असलं तरी याचं इनाम मात्र नक्कीच मिळणार आहे.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close