महिलेच्या पोटातून काढला दीड किलोचा केसांचा गुच्छा

  मेडिकल विश्वात आज काल असे काही प्रकरण समोर येत आहेत त्यामुळे आपण हैराण होतो. कधी रुग्णाच्या पोटातून टॉवेल मिळतो तर कधी सुई... आता असे एक प्रकरण समोर आले आहे, त्यात एका महिलेच्या पोटातून  डॉक्टरांनी केसांचा गुच्छा बाहेर काढला आहे. केसांचा गुच्छा साधासुधा नाही तर पूर्ण दीड किलोचा आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Nov 22, 2017, 09:53 PM IST
महिलेच्या पोटातून काढला दीड किलोचा केसांचा गुच्छा  title=

इंदूर :  मेडिकल विश्वात आज काल असे काही प्रकरण समोर येत आहेत त्यामुळे आपण हैराण होतो. कधी रुग्णाच्या पोटातून टॉवेल मिळतो तर कधी सुई... आता असे एक प्रकरण समोर आले आहे, त्यात एका महिलेच्या पोटातून  डॉक्टरांनी केसांचा गुच्छा बाहेर काढला आहे. केसांचा गुच्छा साधासुधा नाही तर पूर्ण दीड किलोचा आहे.

कसा तयार झाला केसांचा गुच्छा... 

हे प्रकरण मध्यप्रदेशातील इंदूर येथील आहे. डॉक्टरांनी येथील शासकीय महाराज यशवंतराव रुग्णालयात ही अत्यंत किचकट सर्जरी केली आहे. यात २५ वर्षीय महिलेच्या पोटातून सुमारे १.५ किलो वजनाचा गुच्छा बाहेर काढला आहे. या महिलेला डोक्याचे केस चावू खाण्याची मानसिक विकृती होती. 

तीन तास चालले ऑपरेशन...

ऑपरेशन यशस्वी करण्यासाठी पाच डॉक्टरांची टीम कामी लागली होती. त्यांनी २० नोव्हेंबर रोजी तीन तास ऑपरेशन केले आणि केसांचा गुच्छा बाहेर काढला. या गुच्छ्याला मेडिकल भाषेत ट्रायकोबेजॉर म्हटले जाते. 

कडक झाला गुच्छा...

सर्जरी केल्यानंतर काढण्यात आलेला हा गुच्छा कडक झाला होता. हे केस पोटात जमा होऊन एका गुच्छात जमा झाले. हा गुच्छा काढण्यात आला नसता तर रुग्णाला मोठा धोका निर्माण झाला असता.