15 वर्षांमध्ये 15 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

आत्महत्या केलेल्या 63 टक्के शेतकऱ्यांपैकी 43 टक्के शेतकरी निरक्षर आहेत

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 28, 2017, 11:05 PM IST
15 वर्षांमध्ये 15 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या title=

नवी दिल्ली : केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्याचे प्रमाण प्रचंड मोठे आहे. या आत्महत्या थांबविण्याचे आव्हा राज्य आणि केंद्र सरकारसमोर असतानाच पंजाबमधून धक्कादायक आकडा पुढे येत आहे. पंजाबमध्ये गेल्या 15 वर्षांमध्ये सुमारे 1500 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

शेतकरी आत्महत्या या विषयाव अभ्यास सरण्यासाठी सुखविंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने एक समिती नेमली आहे. या समितीत अर्थतज्ज्ञ, आमदार आणि विविध क्षेत्रातले अभ्यासू लोकांचा समावेश आहे. या समितीपुढे माहिती देताना डॉ. सुखपाल यांनी सांगितले की, 1990 पासून पुढच्या 15 वर्षांमध्ये तब्बल 15,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कापूस आणि इतर शेती उत्पन्नामध्ये होणारी घट आणि वाढती महागाई यांमुळे आर्थिक गर्तेत सापडल्याने प्रामुख्याने शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे पुढे आले आहे.

डॉ. सुखपाल म्हणाले, पंजाबमधील संगरूर, मानसा, बक्षठडा आणि बरनाला या प्रदेशात प्रामुख्याने अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. 2005 ते 2015 पर्यंत 15,000 शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांपैकी 83 टक्के आत्महत्या या कर्जामुळे झाल्या आहेत. यात छोट्या शेतकऱ्यांचा समावेश 76 टक्के आहे. या शेतकऱ्यांकडे  5 एकरांपेक्षाही कमी जमीन आहे. हेच शेतकरी प्रामुख्याने आत्महत्येची शिकार झाले आहेत.

दरम्यान, आत्महत्या केलेल्या 63 टक्के शेतकऱ्यांपैकी 43 टक्के शेतकरी निरक्षर आहेत, अशी माहितीही डॉ. पाल यांनी दिली.