2018 : नववर्षात पंतप्रधान राहणार प्रचंड व्यग्र; विदेश दौऱ्यांची रेलचेल

पंतप्रधान पदावर विराजमान झाल्यावर विदेश दौऱ्यांचा सपाटा लावलेले पंतप्रधान मोदी हे 2018 या नववर्षात पुन्हा एकदा व्यग्र असणार आहेत. 

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Dec 26, 2017, 09:16 AM IST
2018 : नववर्षात पंतप्रधान राहणार प्रचंड व्यग्र;  विदेश दौऱ्यांची रेलचेल title=

नवी दिल्ली : पंतप्रधान पदावर विराजमान झाल्यावर विदेश दौऱ्यांचा सपाटा लावलेले पंतप्रधान मोदी हे 2018 या नववर्षात पुन्हा एकदा व्यग्र असणार आहेत. गुजरात आणि काही राज्यांतील निवडणुक तसेच इतर काही कारणांमुळे गेले 6 महिने मोदींनी विदेश दौऱ्यांमधून काहीसा विसावा घेतला होता. मात्र, आता पुन्हा ते कार्यरत होणार असून, 2018मधील त्यांच्या कार्यक्रमात विदेश दौऱ्यांची रेलचेल असणार आहे.

जॉर्डनच्या राज्यासोबत संवाद?

प्राप्त माहितीनुसार पंतप्रधान मोदी हे 2018च्या जानेवारीत इस्राईलला जाणार आहेत. तेथे ते उभय देशांती संबध दृढ करण्यासाठी पंतप्रधान नेतन्याहू यांची भेट घेतली. तसेच, इस्रायली पंतप्रदानांसोबत ते 16 जानेवारीला प्रीमियम फॉरेने पॉलिसी फोरम- रायसीना डायलॉगलाही संबोधीत करतील. दरम्यान, जॉर्डनच्या राजासोबतही त्यांचा संवाद होण्याची शक्यता आहे.

कॉनडाच्या पंतप्रधानांसोबत मेजवानी

2018चा फेब्रुवारी काहीसा कमी व्यग्रतेचा असेल. तरीही या महिन्यात ते यूएई आणि पॉलेस्टाईन दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. तसेच, ते फ्रांन्चचे राष्ट्राध्यक्ष आणि कॅनडाचे पंतप्रधान यांच्यासोबत एक मेजवानी करण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे असे की, या दौऱ्यादरम्यान, इंटरनॅशनल सोलर अलायन्स (आयएसए) परिषदेचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. यात अनेक आंतरराष्ट्रीय नेते सहभागी होण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये नोंदवणार सहभाग

दरम्यान, 2018 फेब्रुवारी, मार्च दरम्यान, मोदी बिस्मटेक परिषदेसाठी नेपाळला हजेरी लाऊ शकतात. तसेच, एप्रिल महिन्यात मोदी पहिल्यांदाच कॉमनवेल्थ परिषदेत सहभागी होण्यासाठी लंडनला जाण्याची शक्यता आहे. 2018 च्या दुसऱ्या टप्प्यात मोदी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग नोंदवतील. यात ब्रिक्स परिषदेसाठी ते दक्षिण अफ्रिकेला जाण्याची शक्यता आह. तर, जी-20 साठी अर्जेंटीना, इडिया अशियन आणि ईस्ट एशिया परिषदेसाठी ते सिंगापूर दौऱ्यावर रवाणा होऊ शकतात.

सलग चौथ्या वर्षी चीन दौऱ्यावर?

जून 2018 मध्ये मोदी शांग्रीला संवाद परिषदेसाठी ते सिंगापूरला पुन्हा एकदा हजेरी लाऊ शकतात. तसेच, जून मध्येच होत असलेल्या एससीओ परिषदेसाठी मोदी चिनला हजेरी लाऊ शकतात. पंतप्रधा मोदी जर 2018 मध्ये चीनला गेले तर, ते सलग चौथ्या वर्षी चीन दौऱ्यावर असतील.

दरम्यान, पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्यांमध्ये बदलही होऊ शकतो. तसचे, त्यात काही दौरे नव्यानेही समाविष्ट होऊ शकतात, असे आमच्या सूत्रांनी म्हटले आहे.