बिहारमध्ये छठपुजेदरम्यान बुडून २२ जणांचा मृत्यू

बिहारमध्ये छठ पुजेदरम्यान विविध ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांमध्ये २२ जणांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, भागलपूर, बेगुसराय आणि वैशाली जिल्ह्यांतील विविध ठिकाणी तलाव आणि नदीमध्ये बुडून झालेल्या दुर्घटनेत २२ जणांचा मृत्यू झाला. 

Updated: Oct 28, 2017, 09:30 AM IST
बिहारमध्ये छठपुजेदरम्यान बुडून २२ जणांचा मृत्यू title=

पाटणा : बिहारमध्ये छठ पुजेदरम्यान विविध ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांमध्ये २२ जणांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, भागलपूर, बेगुसराय आणि वैशाली जिल्ह्यांतील विविध ठिकाणी तलाव आणि नदीमध्ये बुडून झालेल्या दुर्घटनेत २२ जणांचा मृत्यू झाला. 

समस्तीपूर, सारण, गोपाळगंज, सहरसा येथे दोन-दोन आणि नालंदा, खगडिया, सुपौल, मधेपुरा आणि मुझ्झफरपूर या ठिकाणी प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. पोलिसांच्या माहितीनुसार, वैशाली जिल्ह्याच्या गंगाब्रिजमधील तेरसिया गावांत नदीत बुडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. 

भागलपूर जिल्ह्यात कहलगांव येथील तलावात सूर्याला अर्घ्य देत असताना एका महिलेचा बुडून मृत्यू झाला. बिहारमध्ये छठ पुजेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला होता. मात्र या घटनांनी सणाला गालबोट लागलेय.