दिल्लीत थंडीमुळे ४४ जणांचा मृत्यू

राजधानी दिल्लीपासून उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये थंडीमुळे लोकांचे हाल होत आहेत. पाणी गोठवणारी अशी थंड हवा लागते आहे. पारा हा खाली चालला आहे. ज्यामुळे लोकं थंडीमुळे कापत आहेत.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jan 8, 2018, 11:48 AM IST
दिल्लीत थंडीमुळे ४४ जणांचा मृत्यू title=

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीपासून उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये थंडीमुळे लोकांचे हाल होत आहेत. पाणी गोठवणारी अशी थंड हवा लागते आहे. पारा हा खाली चालला आहे. ज्यामुळे लोकं थंडीमुळे कापत आहेत.

धुकं आणि थंड हवेमुळे लोकांना शेकोट्यांचा आधार घ्यावा लागतो आहे. पण थंडी कमी होण्याचं नावच घेत नाही आहे. दिल्लीमध्ये अनेक जणांना थंडीमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत थंडीमुळे ४४ लोकांचा मृत्यू झाला आहे. गृहमंत्रालयाच्या एका अहवालात याचा खुलासा झाला आहे.