1 एप्रिलपासून सरकारी कर्मचार्‍यांच्या पगारात होणार वाढ

सरकारी कर्मचार्‍यांना लवकरच खुषखबर मिळणार आहे.

Updated: Mar 13, 2018, 03:42 PM IST
1 एप्रिलपासून सरकारी कर्मचार्‍यांच्या पगारात होणार वाढ  title=

मुंबई : सरकारी कर्मचार्‍यांना लवकरच खुषखबर मिळणार आहे.

सातव्या वेतन आयोगानंतर कर्मचार्‍यांच्या वेतनामध्ये मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे वेतन आयोगातील मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार सरकारी कर्मचार्‍यांना कमीत कमी 3000ची वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी 18,000 रूपयांची वाढ झाल्याने किमान बेसिक 21,000 रूपये होण्याची शक्यता आहे. 

निवडणूकांचे लक्ष्य ठेवून घेतला निर्णय 

पुढील वर्षी येऊ घातलेल्या लोकसभा निवडणूका लक्षात घेता सरकार सातवे वेतन लवकर मंजूर करण्याची शक्यता आहे. यामुळे सुमारे लाखो कर्मचार्‍यांना आणि परिवारांना आनंदाची बातमी मिळणार आहे. 

कर्मचार्‍यांच्या मागण्या 

6 जुलै 2017 साली सातव्या वेतन आयोगाच्या शिफारस गॅझेटमधील मागण्यांवर विचार सुरू आहे. सातव्या वेतन आयोगानुसार प्रतिमहिना 7 ते 18  हजार रूपयांनी वेतन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे 21,000 हे किमान वेतन होण्याची शक्यता आहे. 

फिटमेंट फॅक्टर 3 पट 

फीटमेंट फॅक्तर 2.57 च्या ऐवजी आता 3 पट वाढवला जाणार आहे. याचा फायदा कर्मचार्‍यांना एप्रिल 2018 पासून मिळण्याची शक्यता आहे. कर्मचार्‍यांनी किमान वेतन  18,000 हून 26,000 करण्याची मागणी केली आहे. सोबतच फीटमेंट फॅक्टर 3.68 पट होण्याची शक्यता आहे. 

कनिष्ठ दर्जाच्या कर्मचार्‍यांना फायदा 

अर्थमंत्री अरूण जेटली मध्य स्तरापेक्षा कनिष्ठ दर्जाच्या कर्मचार्‍यांना अधिक फायदा मिळावा यासाठी प्रयत्न करत आहे. असे एका अधिकार्‍याने सांगितले आहे. मध्यम स्तरावरील कर्मचार्‍यांना अधिक फायदा मिळण्याची शक्यता कमी आहे.