जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेकीचे प्रमाण घटले

जम्मू-काश्मीरमधील दगडफेकचे प्रमाण 90 टक्क्यांनी कमी झाल्याचे राज्य पोलीस विभागाचे डीजीपी एस. पी. वैद्य यांनी सोमवारी म्हटले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यांदा खूप कमी प्रमाणात दगडफेक झाली. हे मोठे यश असून, या यशाचे श्रेय काश्मीरमधील लोकांना जाते, असेही वैद्य यांनी म्हटले आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 13, 2017, 04:59 PM IST
जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेकीचे प्रमाण घटले title=

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील दगडफेकचे प्रमाण 90 टक्क्यांनी कमी झाल्याचे राज्य पोलीस विभागाचे डीजीपी एस. पी. वैद्य यांनी सोमवारी म्हटले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यांदा खूप कमी प्रमाणात दगडफेक झाली. हे मोठे यश असून, या यशाचे श्रेय काश्मीरमधील लोकांना जाते, असेही वैद्य यांनी म्हटले आहे.

डीजीपी वैद्य म्हणाले, गेल्या वर्षापर्यंत काश्मीर खोऱ्यात तब्बल 40 ते 50 दिवस दगडफेकीच्या घटना चालत असत. तसेच, दगडफेक हा प्रकार तिथे अगदी सर्वसामान्य होता. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत विचार करू पाहता यंदा या घटनांमध्ये 90 टक्क्यांची घट झाली आहे. या वर्षातील महिन्यांपैकी अनेक आठवडे असे गेले आहेत की, त्या संपूर्ण आठवड्यात एकदाही दगडफेकीच्या घटना घडली नाही. हे काश्मीर जनतेच्या मानसिकतेत झालेला बदलच असल्याचे वैद्य यांनी म्हटले आहे.

काश्मीर खोऱ्यातील दगडफेकीचे घटते प्रमाण हे नव्या बदलाची नांदी आहे. अनेकदा संपूर्ण दिवसात एकही दगडफेकीची घटना घडत नाही. अगदी शुक्रवारीही एकही दगडफेकीची घटना घडत नाही. गेल्या वर्षी फक्त शुक्रवारच्या 40 ते 50 दगडफेकीच्या घटना घडत असत. दिवशी  कायदा आणि सुव्यवस्थेतही मोठ्या प्रमाणात बदल होत असून, इथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती घेतली जात आहे. एएनआयने मारलेल्या छाप्यांमुळे हा मोठा बदल झाल्याचेही वैद्य म्हणाले.