चीनला धूळ चारत भारताची दमदार कामगिरी; पण...

भारताने चीनला तडाखा दिला आहे. आंतरराष्ट्रीय लष्करी स्पर्धेत भारताने चिनला धूळ चारली आहे.

Updated: Aug 12, 2017, 01:58 PM IST
चीनला धूळ चारत भारताची दमदार कामगिरी; पण...

नवी दिल्ली : डोकलामच्या मुद्द्यावरून भारत-चीन उभय देशांमध्ये मोठा तणाव आहे. आपल्या लष्करी सामर्थ्याच्या जोरावर चीन भारताला धमकावू पाहात आहे. मात्र, भारतही चिनच्या नजरेला नजर भिडवून उभा आहे. आपल्या धमक्यांना भारत भिक घालत नाही हे पाहून चिनचा तिळपापड होत आहे. असे असतानाच पुन्हा एकदा भारताने चीनला तडाखा दिला आहे. आंतरराष्ट्रीय लष्करी स्पर्धेत भारताने चिनला धूळ चारली आहे.

डोकलाम प्रश्नी भारत चर्चेच्या मार्गातून तोडगा काढू इच्छितो. मात्र, चीनचे मनसूबे काही वेगळेच आहेत. त्यामुळे उभय देशांच्या सीमांवर मोठा तणाव आहे. दोन्ही देशांचे सैन्य अवघ्या १०० ते १५० मिटर अंतरावर आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय लष्करी स्पर्धेमध्ये भारत आणि चीन या दोन्ही सैन्यानी सहभाग घेतला आहे. अर्थात या स्पर्धेसाठी जगभरातील अनेक देश सहभागी आहेत. मात्र, डोकलाम प्रश्नावरून निर्माण झालेल्या तणावानंतर हे दोन्ही देश स्पर्धेत आमनेसामने आल्यामुळे सर्वांच्या आकर्षणाचा आणि चर्चेचा केंद्रबिंदू ठरले.

या स्पर्धे्या पहिल्या फेरीत भारत, चीन, रशिया आणि कजाकिस्तान यां देशांसह एकूण १९ देश सहभागी झाले होते. पहिल्या फेरीत भारतीय टॅंक भीष्मने उत्कृष्ट प्रदर्शन केले. भीष्म ताकदीपूढे चीनी टॅंकचा अक्षरश: धुव्वा उडाला. चीनी टॅंकचे क्षणार्धात असंख्य तुकडे झाले. पहिली फेरी यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर भारत पूढच्या फेरीत पोहोचला. भारताचा पूढचा सामना १० ऑगस्टला झाला. दुसऱ्या फेरित भारत T-90 टॅंक घेऊन हजर झाला. तसेच, भारताने आणखी एक टॅंक रिजर्व ठेवला होता. मात्र, स्पर्धेदरम्यान दोन्ही टॅंक खराब झाले. त्यामुळे भारत अंतिम फेरीतून बाद झाला.

स्पर्धेमध्ये अंतिम फेरीसाठी भारत केवळ तांत्रीक अडचणींमुळे सहभागी होऊ शकला नाही. त्यामुळे अर्थातच भारताला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. मात्र, या स्पर्धेतही भारताने चिनला धूळ चारली हे पाहून भारतीयांनी भारतीय लष्कराचे कौतूक केले आहे. दरम्यान, स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी (१२ ऑगस्ट) होणार आहे. अंतिम फेरीसाठी रशिया, बेलारूस, कजाकिस्तान आणि चीन सहभागी होत आहेत.

दरम्यन, या स्पर्धेत भारताची कामगिरी मोठी उत्साहपूर्ण आणि दर्जेदार राहिली. शानदार प्रदर्शन पाहून भारताला या स्पर्धेतील प्रबळ दावेदार मानले जात होते. स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत ४८ किलोमिटर रिले रेस झाली होती. रशियात रशिया आणि कजाकिस्तान T-72B3 टॅक, बेलारूस T-72, आणि चीन ९६बी टॅंक सहभागी झाले