धक्कादायक : एकाच कुटुंबातील 6 लोकांची आत्महत्या...

बुराडी प्रकरणाची पुर्नरावृत्ती 

धक्कादायक :  एकाच कुटुंबातील 6 लोकांची आत्महत्या...  title=

मुंबई : कुटुंबातील लोकांनी एकाचवेळी आत्महत्या करणं अशा घटना आता वारंवार समोर येत असतात. बुराडी प्रकरणात एकाच कुटुंबातील 11 जणांनी एकाचवेळी आत्महत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण जग हादरलं. एकाच कुटुंबातील व्यक्तींनी अशाप्रकारे आत्महत्या करणे हे अतिशय धक्कादायक आहे. अशीच एक घटना झारखंडमधील हजारीबागमध्ये घडली आहे. एकाच कुटुंबातील 6 लोकांनी आत्महत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कुटुंबातील व्यक्तींनी फास लावून ही आत्महत्या केली आहे. 5 लोकांनी फासाला लटकून आत्महत्या केली असून एकाने छतावरून उडी मारून आत्महत्या केली. 

पोलिसांना या कुटुंबातील लोकांची सुसाईड नोट मिळाली आहे. शेजारच्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मारवाडी कुटुंबाचे दुकान होते. या व्यवसायात त्यांना भरपूर नुकसान झालं. याच कारणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी देखील दिलेल्या माहितीनुसार, या कुटुंबाने याच कारणामुळे आत्महत्या केली आहे. मात्र पोलिस सुसाइड आणि मर्डर अशा दोन्ही प्रकारे तपास करत आहेत. 

commit suicide in hazaribagh

मृतांची नावे 

आत्महत्या करणाऱ्यांमध्ये 70 वर्षाच्या महावीर माहेश्वरी त्यांची पत्नी किरण माहेश्वरी या 65 वर्षाच्या आहेत. या दोघांचा मुलगा 40 वर्षाचे नरेश अग्रवाल त्यांची पत्नी 38 वर्षाच्या प्रीति अग्रवाल. यांचे दोन मुले होते. ज्यांची नावे अमन आणि अंजली असून त्यांची वय 8 वर्षे आणि 6 वर्षे आहेत.