'काश्मीरचा विशेष दर्जा संपवाल तर याद राखा'

जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढाल तर याद राखा, काश्मीरमध्ये आंदोलन होईल

Updated: Aug 7, 2017, 08:36 PM IST
'काश्मीरचा विशेष दर्जा संपवाल तर याद राखा' title=

श्रीनगर : जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढाल तर याद राखा, काश्मीरमध्ये आंदोलन होईल, असा इशारा जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी दिला आहे. जम्मू काश्मीरची स्वायत्तता संपवण्याचा भाजप आणि संघाचा डाव असल्याचा आरोपही अब्दुल्ला यांनी केला आहे.

अनुच्छेद ३५ एमध्ये कोणतेही बदल केलेत तर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देईन, असं आश्वासन मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी दिलं होतं. मेहबुबा मुफ्तींना हे आश्वासन लक्षात असेल, असंही अब्दुल्ला म्हणाले.

अनुच्छेद ३५ एच्या अंतर्गत जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देण्यात आले आहेत. या अनुच्छेदानुसार जम्मू, काश्मीर आणि लडाखची सुरक्षा सुनिश्चित होते. महाराजांच्या वेळेपासूनच राज्याच्या संस्कृतीला बाहेरच्या नागरिकांपासून वाचवण्यासाठी ३५ एचा वापर केला जातो.