'आज एअर इंडिया विकताय, उद्या काश्मीरचाही लिलाव कराल'

एअर इंडियाचं निर्गुतवणुकीकरण करण्याच्या सरकारच्या निर्णयावर शिवसेनेनं टीका करत भाजपवर निशाणा साधलाय. सेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'मध्ये ही टीका करण्यात आलीय.  

Updated: Jul 1, 2017, 10:21 AM IST
'आज एअर इंडिया विकताय, उद्या काश्मीरचाही लिलाव कराल' title=

नवी दिल्ली : एअर इंडियाचं निर्गुतवणुकीकरण करण्याच्या सरकारच्या निर्णयावर शिवसेनेनं टीका करत भाजपवर निशाणा साधलाय. सेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'मध्ये ही टीका करण्यात आलीय.  

भविष्यात खर्च उचलू शकत नाही या आधारावर आज एअर इंडिया विकायला काढलीय याच आधारावर उद्या काश्मीरलाही लिलावात काढाल असं म्हणत या निर्णयाला आपला विरोध सेनेनं दर्शवलाय. 

इतकंच नाही तर या निर्णयावरून सरळ पंतप्रधानांनाच शिवसेनेनं टार्गेट केलंय. नरेंद्र मोदी सरकारवर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. जर या सरकारला एखादी विमानसेवा चालवता येत नसेल तर ते देश कसा चालवतील? असं म्हणत त्यांनी मोदींच्या नेतृत्वावरही टीका केलीय. 

'आज विमानकंपनी विकली जातेय कारण त्यांच्यावर ५०,००० करोड रुपयांचं कर्ज आहे. उद्या सरकार म्हणेल काश्मीर खोऱ्याचा खर्च उचलण्यासाठी आम्ही असमर्थ आहोत, म्हणून लिलाव करत आहोत... त्यांच्यावर विश्वास केला जाऊ शकत नाही' असं सामनामध्ये म्हटलं गेलंय. 

जर हाच निर्णय यूपीए सरकारनं घेतला असता तर याच भाजपनं त्यांना सोडलं नसतं... असं म्हणत शिवसेनेनं विरोधकांचंही काम हलकं केलंय. तर महाराजा (एअर इंडिया) भिकारी कसा बनला? असा प्रश्नही त्यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांना विचारलाय.