'इडी'ची मोठी कारवाई; कार्ती चिदंबरम यांची सपत्ती जप्त

अंमलबजावणी संचलनलायाने (ईडी) माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांना मोठा झटका सोमवारी दिला. 'इडी'ने कार्ती चिदंबरम यांची सर्व संपत्ती जप्त केली असून, बॅंक खातीही गोठवली आहेत. 

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 25, 2017, 03:34 PM IST
'इडी'ची मोठी कारवाई; कार्ती चिदंबरम यांची सपत्ती जप्त title=

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचलनलायाने (ईडी) माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांना मोठा झटका सोमवारी दिला. 'इडी'ने कार्ती चिदंबरम यांची सर्व संपत्ती जप्त केली असून, बॅंक खातीही गोठवली आहेत. 

प्राप्त माहितीनुसार, चिदंबरम यांच्या बॅंक खात्यात ९० लाख रूपये रकमेच्या मुदत ठेवी होत्या. ईडीचा ससेमिरा आपल्या पाठिमागे लागल्यावर चिदंबरम यांनी आपली संपत्ती विकण्याचा तसेच, बॅंक खाती बंद करण्याच्या हलचाली सुरू केल्या होत्या. चिदंबरम यांच्या या हालचालींचा ईडीला सुगावा लागताच ईडीने वेगाने कारवाई करत हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. कार्ती यांन आपले वडील पी. चिदंबरम हे केंद्रीय अर्थमंत्री असताना अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात विदेशी गुंतवणूक केली. हे प्रकरण उजेडात येऊ नये यासाठी विदेशी रकमेच्या गुंतवणुकीचे आकडे चुकीचे दाखवले आणि दिशाभूल केली. ही बाब ईडीच्या तपासात उघड झाली होती.

गेले काही दिवस ईडीने कार्ती चिदंबरम यांना निशाण्यावर घेतले आहे. सीबीआयनेही त्यांना अनेक वेळा चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, कार्ती चिदंबरम यांनी सीबीआयचा आदेश फारसा मनावर न घेता चौकशीला नकार दिला. सीबीआयच्या चौकशी आदेशावर कार्ती यांनी दावा केला होता की, विशेष न्यायालयाने मला सर्व आरोपातून मुक्त केले होते. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी तेथेच संपली होती. या प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनीही सीबीआयवर टीका केली होती.