अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा लश्कर-ए-तोयबाचा मास्टरमाइंड ठार

काश्मीरमधील अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि लश्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर अबू इस्माइलला सुरक्षा दलाच्या जवानांनी ठार केले. जवानांनी लश्कराच्या दोन अतिरेक्यांना ठार केलेय.

अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा लश्कर-ए-तोयबाचा मास्टरमाइंड ठार

जम्मू-काश्मीर : काश्मीरमधील अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि लश्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर अबू इस्माइलला सुरक्षा दलाच्या जवानांनी ठार केले. जवानांनी लश्कराच्या दोन अतिरेक्यांना ठार केलेय.

आज अरिगाम भागात अबू सुरक्षा दलाच्या सापळ्यात अडकला. यावेळी जोरदार चकमक होऊन त्यात अबूला ठार करण्यात आले. अबूसह छोटा कासिम यालाही ठार करण्यात आले असून दोघेही पाकिस्तानातील होते, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दोघांचेही मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. 

 श्रीनगरजवळील नौगाममधील अरिबाग येथे आज चकमकीत झाली. १० जुलै रोजी लश्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर हल्ला चढवला होता. या हल्ल्यात ७ यात्रेकरूंना जीव गमवावा लागला होता, तर १९ जण जखमी झाले होते. त्यानंतर जम्मू-काश्मीर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा या हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेला दहशतवादी अबूच्या शोधात होत्या. अबू तीन वर्षांपूर्वी सीमेवरुन घुसखोरी करुन काश्मीरमध्ये आला होता.