अबू इस्माइलचा खात्मा करण्यात, जम्मू काश्मीर पोलिसांना यश

श्रीनगरलगतच्या नौगाम भागातल्या अरीबागमध्ये दहशतवादी आणि जम्मू काश्मीर पोलीस यांच्यात चकमक झाली. 

Updated: Sep 14, 2017, 10:16 PM IST
अबू इस्माइलचा खात्मा करण्यात, जम्मू काश्मीर पोलिसांना यश

जम्मू-काश्मीर : अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या भ्याड हल्लाचा मास्टरमाईंड अबू इस्माइलचा खात्मा करण्यात, जम्मू काश्मीर पोलिसांना यश आलंय. श्रीनगरलगतच्या नौगाम भागातल्या अरीबागमध्ये दहशतवादी आणि जम्मू काश्मीर पोलीस यांच्यात चकमक झाली. 

या चकमकीत दोन दहशतवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातलं. यामध्ये लष्कर ए तोयबाचा कमांडर अबू इस्माइल याचाही समावेश आहे. अरीबागमध्ये परदेशी दहशतवादी लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. त्यात अबू इस्माइल मारला गेला. 

10 जुलैला अमरनाथ यात्रेकरुंवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा अबू इस्माइल हा मास्टरमाईंड होता. या हल्ल्यात निष्पाप आठ यात्रेकरुंना आपले प्राण गमवावे लागले होते.