चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्याला आता फाशी!

पंतप्रधान मोदी यांच्या कॅबिनेटने आज महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Updated: Apr 21, 2018, 02:45 PM IST
चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्याला आता फाशी! title=

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी यांच्या कॅबिनेटने आज महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणानंतर देशभरात संतापाचं वातावरण असताना आता सरकारने पोक्सो कायद्यात सुधारणा करण्यास परवानगी दिली आहे.

'प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्सुअल ऑफेन्स' कायद्यात बदल झाल्यानंतर आता 12 वर्षाखालील चिमुरडींवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा होणार आहे.सध्या पॉक्सो कायद्यात दोषीला कमीत कमी 7 वर्ष ते आजीवन कारावासाची शिक्षा होते.

पीएम मोदींनी लंडनमध्ये भारत की बात सबके साथ कार्यक्रमात देशातील वाढत्या बलात्काराच्या घटनांवर चिंता व्यक्त केली. सरकार आता याविरोधात कडक पाऊलं उचलण्याच्या तयारीत आहे. आज कॅबिनेटच्या बैठकीत याबाबत मोठा निर्णय घेण्यात आल आहे.