अण्णा हजारेंचं सातव्या दिवशी दिल्लीतलं उपोषण मागे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं आहे. 

Jaywant Patil Updated: Mar 29, 2018, 05:50 PM IST
अण्णा हजारेंचं सातव्या दिवशी दिल्लीतलं उपोषण मागे title=

नवी दिल्ली : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपलं दिल्लीतील उपोषण मागे घेतलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं आहे. अण्णा हजारे यांच्या काही मागण्या सरकारकडून पूर्ण करण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.  आश्वासन पूर्ण न झाल्यास आपण पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. अण्णा हजारे यांचा उपोषणाचा आज सातवा दिवस होता. अखेर मुख्यमंत्र्यांनी अण्णा हजारे यांची भेट घेऊन मागण्या पूर्ण करण्याविषयी अण्णा हजारेंना सांगितलं. 

सात दिवसानंतर अण्णा हजारे यांचं उपोषण मागे

अण्णा हजारे यांनी दिल्लीत रामलीला मैदानावर मागील सात दिवसापासून उपोषण सुरू ठेवलं होतं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत भाषण केलं. यापूर्वी अण्णा हजारे यांना व्यासपीठावर भेटण्यासाठी पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल आले होते, पण अण्णा हजारे यांनी राजकीय व्यक्तींची भेट टाळली होती.