या ५ शूर महिलांनी भारताची मान उंचावली

भारतीय सेना आज ७०वा आर्मी दिवस साजरा करत आहे. 

Updated: Jan 15, 2018, 11:34 PM IST
या ५ शूर महिलांनी भारताची मान उंचावली  title=

मुंबई : भारतीय सेना आज ७०वा आर्मी दिवस साजरा करत आहे. या प्रसंगी आम्ही तुम्हाला भारताच्या अशा महिला अधिकाऱ्यांबाबत माहिती देणार आहोत, ज्यांनी भारताचं नाव जगात उंचावलं.

पुनीत अरोरा

पुनीत अरोरा या भारताच्या पहिल्या महिला आहेत ज्यांनी भारतीय सशस्त्र बलाची दुसरी सगळ्यात मोठी रॅकिंग लेफ्टनंट जनरलची पोस्ट सांभाळली. पुनीत अरोरा भारतीय नौसेनेच्या पहिल्या महिला व्हाईस अॅडमिरलही होत्या. 

पद्मावती बंडोपाध्याय

पद्मावती बंडोपाध्याय या भारतीय वायूसेनेच्या पहिल्या महिला एअर मार्शल होत्या. 

दिव्या अजित कुमार 

'स्वॉर्ड ऑफ ऑनर'चा किताब मिळवणाऱ्या दिव्या अजित कुमार या पहिल्या महिला कॅडेट होत्या. 

अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंग 

अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंग या भारतीय वायुसेनेच्या लढाऊ विमानाच्या पहिल्या पायलट होत्या.

गुंजन सक्सेना 

गुंजन सक्सेना या भारतीय वायुसेनेच्या पहिल्या महिला अधिकारी होत्या ज्या युद्ध क्षेत्रात गेल्या. गुंजन सक्सेनांचा उल्लेख कारगील गर्ल म्हणूनही केला जातो.