एअर होस्टेस छेडछाड - मारहाण : भाजप नेत्याच्या मुलांच्या अडचणींत वाढ

अवधेश नारायण यांच्या दोन्ही मुलांनी तिला आपल्या सरकारी निवासस्थानी बोलावत वेगवेगळं लग्नासाठी प्रपोज केलं

Updated: May 24, 2018, 10:49 PM IST
एअर होस्टेस छेडछाड - मारहाण : भाजप नेत्याच्या मुलांच्या अडचणींत वाढ  title=

नवी दिल्ली : बिहार विधान परिषदेचे माजी सभापती अवधेश नारायण सिंह यांच्या मुलाच्या अडचणींत वाढ झालीय. पाटणा सिव्हिल कोर्टानं एअर होस्टेसला मारहाण आणि छेडछाडीच्या आरोपाखाली त्यांच्या दोन्ही मुलांविरुद्ध अटक वॉरंट जारी केलंय. दोन्ही आरोपींना पाटणा पोलीस कोणत्याही क्षणी अटक करू शकतात. भाजप नेते अवधेश नारायण सिंह यांचे दोन्ही मुलं प्रशांत आणि सुशांत रंजन यांच्यावर एका एअर होस्टेसनं छेडछाड आणि मारहाणी आरोप केलाय. 

एअर होस्टेसनं तक्रार दाखल केल्यानंतर दोन्ही आरोपी गायब आहेत. यापूर्वी पीडित महिलेनं मंगळवारी रात्री उशीरा अवधेश नारायण सिंह यांच्या घरी जाऊन त्यांची भेटही घेतली होती... यावर प्रतिक्रिया देताना अवधेश सिंह आपल्याला आपल्या वडिलांप्रमाणे असल्याचंही तिनं म्हटलं होतं. 

पाटणाची रहिवासी असलेल्या एअर होस्टेस महिलेनं केलेल्या आरोपानुसार, अवधेश नारायण यांच्या दोन्ही मुलांनी तिला आपल्या सरकारी निवासस्थानी बोलावत वेगवेगळं लग्नासाठी प्रपोज केलं. जेव्हा तिनं या दोघांचीही लग्नाची ऑफर धुडकावून लावली तेव्हा त्यांनी महिलेला मारहाण केली. 

उल्लेखनीय म्हणजे अवधेश नारायण सिंह हे भाजपचे दिग्गज नेते मानले जातात. मात्र, या प्रकरणामुळे त्यांच्या दोन्ही मुलांच्या अडचणींत वाढ झालीय.