मेहुल चोक्सीला देशाबाहेर पळून जाण्यासाठी जेटलींच्या मुलीकडून मदत

देशातल्या सगळ्या महत्वाच्या यंत्रणांना मेहुल चोक्सी देशाबाहेर पळून जाणार याची संपूर्ण कल्पना होती.

Updated: Oct 22, 2018, 03:10 PM IST
 मेहुल चोक्सीला देशाबाहेर पळून जाण्यासाठी जेटलींच्या मुलीकडून मदत title=

नवी दिल्ली: हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून देशाबाहेर निसटलेल्या मेहूल चौकसीला अर्थमंत्री अरुण जेटलींची मुलगी सोनाली जेटली आणि त्यांचे पती जयेश बक्षी या दोघांनी मदत केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. 
 
 काँग्रेसचे नेते आणि राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंबंधी माहिती दिली. 
 
 देशातल्या सगळ्या महत्वाच्या यंत्रणांना मेहुल चोक्सी देशाबाहेर पळून जाणार याची संपूर्ण कल्पना होती. पण त्याविषयी काहीच कारवाई करण्यात आली नाही. प्रत्यक्षात ४ जानेवारी २०१८ ला चोकसी देशबाहेर पळाला. त्यापूर्वी गितांजली ज्वेलर्सने सोनाली जेटली आणि त्यांचे पती जयेश जेटलींना आपले वकीलपत्र दिल्याचा दावा पायलट यांनी केला. 
 
 त्यामुळे आता काँग्रेसच्या या आरोपांवर अरूण जेटली कशाप्रकारे बचाव करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.